शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळी लागणार पर्यटक कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 16:46 IST

जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने जिल्ह्यातील अजिंठा, वेरूळ आणि दौलताबाद या तीन ठिकाणी पर्यटक कर आकारण्याचा प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने एकमताने मंजुरी दिली. आता त्या प्रस्तावास शासनाची मंजुरी घेतली जाणार आहे. 

औरंगाबाद : जिल्ह्यातील अजिंठा, वेरूळ आणि दौलताबाद या तीन पर्यटनस्थळांना भेट देणार्‍या पर्यटकांना ‘पर्यटक कर’ लावल्यास ग्रामपंचायतींना चांगले उत्पन्न मिळेल. प्राप्त उत्पन्नातून पर्यटनस्थळी दर्जेदार सुविधा निर्माण करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. 

जिल्हा परिषदेने जानेवारी महिन्यात राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पदाधिकारी, सदस्य, बीडीओंचा अभ्यास दौरा आयोजित केला होता. त्यावेळी सिंधुदुर्ग व विजयदुर्ग या दोन किल्ल्यांच्या ठिकाणी तेथील ग्रामपंचायतींनी पर्यटक कराची पद्धत अवलंबिली असून, त्यातून चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळत असल्याची बाब समोर आली.

औरंगाबाद जिल्ह्याकडे तर पर्यटनाची राजधानी म्हणून बघितले जाते. या जिल्ह्यातही पर्यटक कराची संकल्पना राबविली, तर येथील ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल. पर्यायाने पर्यटनस्थळी खास पर्यटकांसाठी सुलभ शौचालये, शुद्ध पिण्याचे पाणी, पार्किंग, कचर्‍याचे व्यवस्थापन, रस्ते आदी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे सोपे होईल. सर्वांगाने हा विचार करून जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने जिल्ह्यातील अजिंठा, वेरूळ आणि दौलताबाद या तीन ठिकाणी पर्यटक कर आकारण्याचा प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने एकमताने मंजुरी दिली. आता त्या प्रस्तावास शासनाची मंजुरी घेतली जाणार आहे. 

सदरील पर्यटक कर हा व्यक्तीला आकारलेला कर असल्यामुळे त्यास शासनाची मंजुरी अनिवार्य आहे. शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायत कर वसूल केल्यानंतर त्या पर्यटकास निश्चित केलेल्या रंगाचा पास देईल. हा कर संबंधित ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रहिवासी, ५ वर्षांखालील पर्यटक मुलांना लागू राहणार नाही. ग्रामपंचायतींनी वसूल केलेला कर हा जिल्हा परिषदेच्या ग्रामनिधीत जमा केला जाणार असून, प्राप्त जमा करांपैकी २५ टक्के रक्कम ही ग्रामपंचायतींना, तर उर्वरित ७५ टक्के रकमेतून पर्यटनस्थळी मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी खर्च केला जाणार आहे. 

सरासरी २० ते २५ लाख रुपये होतील जमायासंदर्भात पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके म्हणाले की, पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी येणार्‍या ६ ते १२ वयोगटातील पर्यटकांकडून प्रत्येकी किमान ३ रुपये, तर प्रौढ पर्यटकांकडून ५ रुपये वसूल केले जातील. शैक्षणिक सहलीमध्ये येणार्‍या विद्यार्थ्यांना यामध्ये बर्‍यापैकी सूट देण्यात आली असून, प्रती विद्यार्थी १ रुपया कर आकारला जाईल. यामध्ये वार्षिक एकूण कर सरासरी २० ते २५ लाख रुपये जमा होऊ शकेल, अशी अपेक्षा सोळंके यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Taxकरtourismपर्यटनAjantha - Elloraअजंठा वेरूळAurangabadऔरंगाबादzpजिल्हा परिषदDoulatabad Fortदौलताबाद किल्ला