शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
2
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
3
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
4
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
5
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
6
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
7
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
8
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा
9
७ सीटर Kia Carens CNG मध्ये झाली लॉन्च; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत, Ertiga ला देणार टक्कर
10
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
11
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
12
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
13
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
14
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
15
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
16
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
17
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
18
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
19
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
20
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले

अजिंठा लेणीचा जागतिक वारसा न पाहताच जाताहेत पर्यटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 07:22 IST

खराब रस्त्यामुळे अनेक पर्यटक अजिंठा लेणी न पाहताच परतत असल्याचे चित्र आहे.

श्यामकुमार पुरे

छत्रपती संभाजीनगर नगर :छत्रपती संभाजीनगर-जळगाव या मार्गासाठी तब्बल १,५५० कोटी रुपये केंद्र सरकारने २०१३ मध्ये मंजूर करूनही अद्याप हे काम पूर्णत्वास गेलेले नाही. खराब रस्त्यामुळे अनेक पर्यटक अजिंठा लेणी न पाहताच परतत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे अर्धवट कामांमुळे २०२४-२५ या वर्षात या रस्त्यावर ४० जणांचा अपघातांमध्ये बळी गेला आहे.

छत्रपती संभाजीनगर-जळगाव हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७६२ मराठवाडा, खान्देश या दोन प्रमुख विभागांना जोडतो. जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांना जाण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग असून, देश-विदेशातील पर्यटक येथे येतात.

कुठले काम अद्याप बाकी: भवनजवळील पूर्णा नदी, पालोद येथील पूल, अजिंठा येथील वाघूर नदीजवळील काम अजूनही बंद आहे. याशिवाय ठिकठिकाणी असलेल्या पुलाजवळ पॅचअप बाकी आहे. त्यावरून वाहने धडाधड आदळतात. त्यावर भराव टाकण्याची तसदी कंत्राटदाराने घेतलेली नाही.

लक्ष दिले जात नाही 

केंद्र सरकारने या रस्त्याच्या कामासाठी २०१३ मध्ये १,५५० कोटी रुपये मंजूर केले होते. २५ डिसेंबर २०१५ रोजी या कामाचे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यानंतर या रस्त्याचे काम वेगाने होणे अपेक्षित असताना महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दरवर्षी हजारो देशी-विदेशी पर्यटक वेरीळ, बीबीका मकबरा ही प्रसिद्ध ठिकाणे पाहण्यासाठी येतात. वेरूळला जाणारा परदेशी पर्यटक अजिंठाची जागतिक वारसा असलेली लेणी पाहण्यासाठी जाणे अपेक्षित आहे. रस्ता खराब असल्याने निम्म्या पर्यटकांनी इच्छा असूनही लेणी पाहिली नाही.

१,५५० कोटी रुपये केंद्र सरकारने २०१३ मध्ये मंजूर केले. १२ वर्षे उलटली तरी अद्याप हे काम पूर्णत्वास गेलेले नाही.

२०२४ मध्ये वेरूळ लेणीला २३,००० पर्यटकांनी भेट दिली. त्यातील केवळ १२,००० पर्यटकच अजिंठ्याला गेले होते. 

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAjantha - Elloraअजंठा वेरूळ