शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

पर्यटकांना पर्वणी, धुवांधार पावसाने वेरूळचा धबधबा धो-धो वाहू लागला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 19:36 IST

पावसामुळे परिसरातील सर्व पर्यटनस्थळे गर्दीने फुलून गेलेली आहेत.

- सुनील घोडकेखुलताबाद:  खुलताबाद तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे खुलताबाद , वेरूळ परिसरातील छोटे मोठे धबधबे वाहू लागले असून जगप्रसिद्ध वेरूळ लेणीचा धबधबा परत एकदा जोरदारपणे कोसळू लागल्याने पर्यटकांची मोठी गर्दी लेणी परिसरातील हा धबधबा बघण्यासाठी होत आहे. दरम्यान, आज शनिवारी दुपारी २ वाजेच्या दरम्यान तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असल्याने फुलमस्ता, धांड, येळगंगा नदी ही वाहू लागली आहे. 

खुलताबाद परिसरात दोन दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे डोंगरदऱ्यातील झरे, छोटे- मोठे धबधबे वाहू लागल्याने निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक दौलताबाद, खुलताबाद, वेरूऴ, म्हैसमाऴ आदी ठिकाणी गर्दी करीत असल्याने पर्यटकांच्या गर्दीने पर्यटनस्थळे फुलून गेले आहेत.

वेरूऴचा धबधबा कोसळू लागलायंदा पाऊसच नसल्याने वेरूळलेणीचा धबधबा म्हणावा तसा कोसळत नव्हता. पंरतू गेल्या दोन दिवसापासून सुरू झालेल्या पावसामुळे वेरूळ लेणी धबधबा सुरू झाला असल्याने जगप्रससिध्द लेणी पाहण्यासाठी सध्या गर्दी होत आहे. त्यातच वेरूऴलेणीचा धबधबा पर्यटकांचे खास आकर्षण असून या धबधब्यासोबत फोटोसेशन करण्यासाठी गर्दी होत आहे. तसेच म्हैसमाऴ परिसरात आज शनिवारी दुपारी ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने येळगंगा नदी वाहती झाली आहे. वेरूळ लेणी धबधबा येळगंगा नदीवरच असल्याने धबधबा जोरदारपणे कोसळत आहे. म्हैसमाळ, वेरूळ, खुलताबाद, दौलताबाद परिसरात होत असलेल्या पावसात भिजण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. या पावसामुळे  परिसरातील सर्व पर्यटनस्थळे गर्दीने फुलून गेलेली आहेत.

भाविकांची तारांबळश्रावण महिन्यातील तिसरा श्रावणी शनिवार असल्याने खुलताबाद येथील भद्रा मारूती च्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असून जोरदार पडलेल्या पावसामुळे भाविकांची मोठी गैरसोय झाली. वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदीरात ही दर्शनासाठी मोठी गर्दी झाली असून भाविक रांगेत दर्शन घेत आहे. श्रावण महिन्यात शनिवार रविवार वेरूळ, म्हैसमाळ, दौलताबाद , खुलताबाद आदी धार्मिक व पर्यटनस्थळ गर्दीने फुलून जात आहे. त्यामुळे वेरूळ, दौलताबाद घाटात वाहतुकीची कोंडी होत होती.

 

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळRainपाऊसAurangabadऔरंगाबाद