शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात वर्षभरात जन्मले २७३ ‘जुडवा’ आणि ८ तिळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 12:13 IST

चित्रपटांप्रमाणे अगदी खर्‍या अर्थाने अनेक कुटुंबियांत जुळी मुले जन्माला येतात. एकट्या घाटी रुग्णालयात वर्षभरात २७३ जुळ्यांचा जन्म झाला. विशेष म्हणजे ८ तिळे बालकही या ठिकाणी जन्मले.

ठळक मुद्देशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात घाटी रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभाग सर्वाधिक व्यस्त आणि गर्दीचा विभाग म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी दररोज ५० ते ६० प्रसूती होतात. गेल्या वर्षभरात या ठिकाणी तब्बल १७ हजार ९३७ प्रसूती झाल्या.यामध्ये ९ हजार १२० मुले, तर ८ हजार ४४८ मुलींचा जन्म झाला. विशेष म्हणजे वर्षभरात २७३ जुळ्यांचा जन्म झाला, तर ८ तिळेही जन्मले.

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : जुळ्या व्यक्तिमत्त्वांवर आधारित अनेक हिंदी-मराठीत चित्रपट आले आहेत. काही वर्षांपूर्वी गाजलेल्या चित्रपटाचा रिमेकही नुकताच चांगलाच चर्चिला गेला. या चित्रपटामध्ये जुळ्या मुलांच्या बिछडण्याचा आणि परत भेटण्याच्या धमाल गमती दाखविल्या जातात. चित्रपटांप्रमाणे अगदी खर्‍या अर्थाने अनेक कुटुंबियांत जुळी मुले जन्माला येतात. एकट्या घाटी रुग्णालयात वर्षभरात २७३ जुळ्यांचा जन्म झाला. विशेष म्हणजे ८ तिळे बालकही या ठिकाणी जन्मले.

बाळाचा जन्म ही प्रत्येक मातेसाठी, कुटुंबासाठी आयुष्यातील सर्वात मोठी आनंददायी गोष्ट असते. गरोदरपणात मुलगा की मुलगी असा अंदाज काहींकडून वर्तविला जातो. आधुनिक जगात मुलगा आणि मुलगी हा भेद कधीच संपला आहे. त्यामुळे या अंदाजापेक्षा बाळाचा जन्म हा प्रत्येकासाठी अधिक महत्त्वाचा असतो. नऊ महिने काळजी घेतल्यानंतर जन्माला येणार्‍या बाळाने आयुष्यच बदलून जाते, अशा वेळी जुळ्यांचा जन्म झाला तर होणारा आनंदही दुप्पट. जिल्ह्यात जुळ्यांचा जन्म होण्याची संख्या अधिक दिसते. अगदी चित्रपटांमध्ये दिसणारे जुळ्या मुलांचे चित्र अनेक कुटुंबांमध्ये दिसून येत आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात घाटी रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभाग सर्वाधिक व्यस्त आणि गर्दीचा विभाग म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी दररोज ५० ते ६० प्रसूती होतात. प्रसूतीसाठी जिल्हाभरातून गरोदरमाता घाटीत दाखल होतात. गेल्या वर्षभरात या ठिकाणी तब्बल १७ हजार ९३७ प्रसूती झाल्या. यामध्ये ९ हजार १२० मुले, तर ८ हजार ४४८ मुलींचा जन्म झाला. विशेष म्हणजे वर्षभरात २७३ जुळ्यांचा जन्म झाला, तर ८ तिळेही जन्मले. हा आकडा पाहून अनेकांच्या भुवया उंचवतात. सुरक्षित मातृत्वासाठी घाटी रुग्णालयातील प्रसूतिशास्त्र विभाग महत्त्वाची भूमिका निभावत आहे. या ठिकाणी नैसर्गिक प्रसूतीचे प्रमाण अधिक आहे. येथील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी रुग्णसेवेसाठी कायम दक्ष असतात. त्यामुळे सुरक्षित मातृत्वाची यशस्वी कामगिरी हा विभाग बजावत आहे.

सुरक्षित मातृत्वगेली अनेक वर्षे घरी बाळंतपण होण्याचे प्रमाण चिंताजनक होते; परंतु आता जननी सुरक्षा या सारख्या योजनांमुळे सुरक्षित मातृत्व प्राप्त होण्यास हातभार लागत आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात गरोदर मातांना चांगली उपचार पद्धती दिली जात आहे. त्यासाठी सर्वजण कायम तत्पर असतो.- डॉ. श्रीनिवास गडप्पा, विभागप्रमुख, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभाग, घाटी

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीHealthआरोग्यAurangabadऔरंगाबाद