शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गुंगीचे औषध पाजून महिलेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 19:31 IST

ओळखीच्या व्यक्तीनेच विवाहितेला पाण्यातून गुंगीचे औषध पाजत चिमुकल्यासमोर तिच्यावर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली.

औरंगाबाद : ओळखीच्या व्यक्तीने विवाहितेला पाण्यातून गुंगीचे औषध पाजत चिमुकल्यासमोर तिच्यावर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तपास करून आरोपी नराधमाला १५ नोव्हेंबर रोजी बेड्या ठोकल्या. न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत (दि.१९) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरंदळे यांनी दिले. चरण प्रेमसिंग सोनावले (२५,रा. शूलिभंजन, ता. खुलताबाद) असे आरोपीचे नाव आहे. 

जवाहरनगर पोलिसांनी सांगितले की, २४ वर्षीय पीडितेचा पती मोक्काच्या गुन्ह्यात कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. पीडितेला एक मुलगा आणि मुलगी असून, आरोपी आणि ती बालपणापासून ओळखीचे आहेत. आरोपीचे तिच्यावर एकतर्फी प्रेम आहे. पीडिता ही दिवाळीनिमित्त गारखेडा परिसरात भावाच्या घरी आली होती. १२ रोजी सायंकाळी पीडिता मुलासह पतीवरील दोषारोपपत्र आणण्यासाठी जिल्हा न्यायालयात पायी जात होती. त्यावेळी दर्गा रस्त्यावरील एका रुग्णालयाजवळ आरोपी कार घेऊन तेथे आला. तुला कारमधून न्यायालयात सोडतो असे म्हणून तिला कारमध्ये बसविले. गाडीत बसल्यानंतर त्याने पीडितेला व तिच्या मुलाला त्याच्या बाटलीतील पाणी पिण्यास दिले.  ते पाणी प्यायल्यानंतर काही वेळातच पीडिता व तिच्या मुलाला गुंगी आली. 

पीडितेला शुद्ध आली तेव्हा ती एका मोडक्या घरातील अंधाऱ्या खोलीत होती. तेथे आरोपीने तिला शिवीगाळ करून तिच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने हातपाय बांधून तिला मारहाण केली आणि तिच्या चिमुकल्यासमोरच तिच्यावर अत्याचार केला. त्यामुळे पीडिता बेशुद्ध झाली. दुसऱ्या दिवशी पीडिता शुद्धीवर आली तेव्हा तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे दिसले. त्यानंतर ती मुलाला घेऊन पळून जात असताना आरोपीने त्यांना पकडले आणि शिऊर बंगला येथील एका रुग्णालयात तिच्यावर उपचार केले. नंतर तिला तो आत्याच्या घरी घेऊन गेला. १४ रोजी सकाळी त्याने तिला माहेरी आणून सोडले आणि गायब झाला. झालेल्या अत्याचाराची माहिती पीडितेने नातेवाईकांना सांगितली. त्यानंतर ते तिला सोबत घेऊन जवाहरनगर ठाण्यात आले. पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदविला. सहायक निरीक्षक श्रद्धा वायदंडे आणि कर्मचाऱ्यांनी आरोपीला बुधवारी रात्री अटक केली.