शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या आमिषाने अत्याचार, गर्भवती होताच नकार; पुन्हा ब्लॅकमेल केल्याने तरुणीने संपवले जीवन

By राम शिनगारे | Updated: March 11, 2024 12:26 IST

पिसादेवीतील घटनेत मायलेकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

छत्रपती संभाजीनगर : पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केले. त्यातून गर्भवती राहिलेल्या प्रेयसीला गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यानंतरही लग्नाविनाच शारीरिक संबंध ठेवण्यासाठी प्रियकर ब्लॅकमेल करून लागला. या त्रासाला कंटाळून तरुणीने गळफास घेऊन शनिवारी सायंकाळी आत्महत्या केली. ही घटना पिसादेवी परिसरात घडली. या प्रकरणी प्रियकरासह त्याच्या आईच्या विरोधात लैंगिक अत्याचारासह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा चिकलठाणा पोलिस ठाण्यात नोंदवला आहे.

प्रियकर ऋषिकेश विनायक तळेकर व त्याची आई सुरेखा विनायक तळेकर (रा. अयोध्यानगर, एन-७, सिडको) अशी आरोपींची नावे आहेत. आत्महत्या केलेल्या तरुणीच्या मामाने दिलेल्या तक्रारीनुसार दीक्षा (नाव बदललेले) ही आरोपी ऋषिकेशसोबत २०१८ पासून रिलेशनशिपमध्ये होती. याच कालावधीमध्ये आरोपीने दीक्षाला लग्नाचे आमिष दाखवून संबंध प्रस्थापित केले. त्यातून तिला दिवस गेले. त्याची माहिती मिळाल्यानंतर त्याने जबरदस्तीने दीक्षाला गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यानंतरही ऋषिकेश लग्नाविनाच तिच्यासोबत संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत होता. ती दबावाला बळी पडत नसल्याचे पाहून त्याने तिला बदनामीची भीती दाखवत जबरदस्ती सुरू केली. तेव्हा तिने आरोपीला विनंती केली. त्याने नकार देत लग्न न करताच सोबत राहण्यासाठी ब्लॅकमेल करण्यास सुरू केले. सततच्या त्रासाला कंटाळून तिने शनिवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी चिकलठाणा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

मामाला पाठवली सुसाईड नोटदीक्षाने आत्महत्या करण्यापूर्वी मामाच्या मोबाईलवर स्वत:च्या हस्ताक्षरातील सुसाईड नोट पाठविली. त्यात माझा ऋषिकेशकडून छळ सुरू आहे. त्याच्या त्रासाला कंटाळूनच मी आत्महत्या करीत आहे. २०१८ पासून दोघे रिलेशनशिपमध्ये होतो. त्यातून गर्भवती राहिले. तेव्हा ऋषिकेशने जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यानंतरही संबंध ठेवण्यासाठी तो ब्लॅकमेल करीत होता. त्याविषयीची माहिती त्याच्या आईला दिल्यानंतर तिनेही मलाच मारहाण करीत धमकी दिल्याचेही सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादpregnant womanगर्भवती महिला