शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीवरून काढण्याची धमकी देत अत्याचार, ब्लॅकमेलिंग; माजी सभापतीच्या पतीचा कारनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 18:10 IST

बीड जिल्ह्यातील गेवराईच्या राजकीय कुटुंबातील तरुणावर बलात्काराचा गुन्हा, पोलिस घरी पोहोचण्यापूर्वीच पसार

छत्रपती संभाजीनगर : नोकरीवरून काढण्याची धमकी देत शासकीय महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार केल्याप्रकरणी गेवराई पंचायत समितीच्या माजी सभापतींचे पती तथा एका राजकीय पक्षाच्या माजी तालुकाध्यक्षाचा मुलगा दीपक प्रकाश सुरवसे (रा. खांडवी, गेवराई, जिल्हा बीड) याच्यावर वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३५ वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. २०१९मध्ये तक्रारदार महिला शासकीय सेवेत रुजू झाली. त्यावेळी दीपकची पत्नी पंचायत समिती सभापती पदी नियुक्त होती; परंतु त्यांच्याऐवजी दीपकच पंचायत समीतीचे सर्व काम पाहत होता. कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांच्या बैठका घेत सूचना करत होता. त्यामुळे तक्रारदार महिला व दीपकची ओळख होती. तक्रारीत नमूद आरोपानुसार, २०२२ मध्ये विभागाच्या कामाचे कारण करून दीपकने महिलेला शहरातील वेदांतनगरमधील एका बड्या हॉटेलमध्ये बोलावले. तेथील खोलीत बोलावून महिलेसोबत जबरदस्ती केली. महिलेने त्याला विरोध केला. मात्र, दीपकने ‘तुला नोकरी गमवावी लागेल,’ अशी धमकी देत अत्याचार केला.

ब्लॅकमेल करण्यास सुरुवातव्हिडीओ, छायाचित्राचा आधार घेत दीपकने महिलेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. कुटुंबाला व्हिडीओ, छायाचित्र पाठविण्याची धमकी देत महिलेवर इगतपुरी, नाशिक, शहरातील पडेगाव भागात अत्याचार केले. बदनामीच्या भीतीने महिला त्याचा छळ सहन करत होती. मे २०२५ मध्ये त्याने महिलेला पतीपासून घटस्फोट घेण्यास भाग पाडले. त्याच्या छळाला कंटाळून महिला काही महिन्यांपूर्वी शहरात स्थायिक झाली. २ जुलै रोजी दीपकने शहरात येऊन, महिलेच्या घराजवळ मोठमोठ्याने गोंधळ घातला. मुलांना व्हिडीओ दाखवण्याची धमकी देत धक्काबुक्की केली. ३ जुलै रोजी महिलेने त्याच्या वडिलांना सर्व प्रकार सांगितला. तेव्हा त्याच्या वडिलांनी देखील महिलेला शिवीगाळ करून तक्रार केल्यास नोकरीवरून काढण्याची धमकी देत हाकलून लावले.

बीडवरून शहरात अर्ज वर्गमहिलेने याप्रकरणी बीड पोलिसांकडे तक्रार केली. बीड पोलिसांनी ती शहर पोलिसांकडे वर्ग केली. वेदांतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस अटकेसाठी त्याच्या घरी जाण्यापूर्वीच दीपक पसार झाला होता. त्याला लवकरच अटक केली जाईल, असे वेदांतनगरच्या निरीक्षक प्रविणा यादव यांनी सांगितले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याsexual harassmentलैंगिक छळ