शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

आजच्या अशांत जगाला ‘सुफी तत्त्वज्ञाना’ची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:43 AM

जागतिक अस्थिरता, अशांतता आणि असहिष्णुतेच्या काळात मानवता प्रेम, विश्वशांती आणि विश्वबंधुत्व प्रस्थापित करण्याचे सामर्थ्य सुफी तत्त्वज्ञानामध्ये आहे, असे प्रतिपादन डॉ. मुहम्मद आजम यांनी केले. डॉ. आजम यांनी राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकरिता नुकतेच ‘सुफीवाद आणि तुलनात्मक धर्मशास्त्र’ हा प्रकल्प पूर्ण केला आहे. सुफी तत्त्वज्ञानाच्या प्रारंभिक अवस्थेपासून ते विकास काळापर्यंतच्या दार्शनिक वैशिष्ट्यांचा सर्वंकष सविस्तर इतिहास सांगणाºया या प्रकल्पानिमित्त त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

ठळक मुद्देतत्त्वज्ञान : ‘सुफी’चा समग्र इतिहास मांडणारे लेखक डॉ. मुहम्मद आजम यांच्याशी संवाद; ‘सुफीवाद आणि तुलनात्मक धर्मशास्त्र’ प्रकल्प

मयूर देवकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जागतिक अस्थिरता, अशांतता आणि असहिष्णुतेच्या काळात मानवता प्रेम, विश्वशांती आणि विश्वबंधुत्व प्रस्थापित करण्याचे सामर्थ्य सुफी तत्त्वज्ञानामध्ये आहे, असे प्रतिपादन डॉ. मुहम्मद आजम यांनी केले. डॉ. आजम यांनी राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकरिता नुकतेच ‘सुफीवाद आणि तुलनात्मक धर्मशास्त्र’ हा प्रकल्प पूर्ण केला आहे. सुफी तत्त्वज्ञानाच्या प्रारंभिक अवस्थेपासून ते विकास काळापर्यंतच्या दार्शनिक वैशिष्ट्यांचा सर्वंकष सविस्तर इतिहास सांगणाºया या प्रकल्पानिमित्त त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.डॉ. आजम अहमदनगर येथील अहमदनगर महाविद्यालयातून हिंदी, उर्दू आणि फारसी भाषेचे प्राध्यापक म्हणून १९९७ साली निवृत्त झाले. ते सुफी तत्त्वज्ञानाकडे फार आधीपासूनच आकर्षित झाले होते. ‘सुफींचे तत्त्वज्ञान म्हणजे साक्षात प्रेममंदिर! तेथे नियमितपणे भक्तीचा सुगंध दरवळतो. भक्तीचे चरमोत्कर्ष रूप म्हणजे प्रेम. अशा सुफी तत्त्वज्ञानाचा मी गेल्या ५० वर्षांपासून अभ्यास करीत आहे, असे ते सांगतात. आपणही याविषयी काही लिहावे अशी त्यांची मनोमन इच्छा होती. त्यांनी ७३ व्या वर्षी ‘सुफी तत्त्वज्ञान : स्वरूप आणि चिंतन’ हा पहिला ग्रंथ लिहिला. त्याला राज्य शासनाचा वाङ्मय पुरस्कारासह इतर सहा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले. लोकमत समूहातर्फे दिल्या जाणाºया ‘लोकरंग’ पुरस्काराचेही ते मानकरी ठरले.२०१६ साली राज्य साहित्य व संस्कृती मंडळाकडून डॉ. आजम यांच्याकडे ‘सुफीवाद आणि तुलनात्मक धर्मशास्त्र’ या बृहद प्रकल्पाची जबाबदारी सोपविण्यात आली. यामध्ये भारतीय तत्त्वज्ञान, पाश्चात्य तत्त्वज्ञान, इस्लामी तत्त्वज्ञान आणि सुफी तत्त्वज्ञान यांचा सर्वंकष आढावा घेण्यात आला आहे. ते म्हणतात, सुफीवादाचा जन्म इस्लाम धर्माच्या शिकवणुकीतून झाला आहे. इस्लाम धर्म म्हणजे सुफी तत्त्वज्ञानाचा पाया. इस्लामचा अर्थ होतो अमन, शांती.हा शांतीचा संदेश जगभर पसरविणारे, हे शांतीचे तत्त्व मानवतेमध्ये निर्माण करणारे लोक म्हणजे सुफी संत. साधारणत: सातव्या-आठव्या शतकामध्ये इराणमध्ये सुफी पंथांची सुरुवात झाली. अबू याझीद, अल किंदी, अल फराबी, इब्न मस्काविया, इब्न सीना, अल गजाली अशा संतांनी सुरुवातीच्या काळात सुफी पंथाचा विकास केला. तेथून मग अनेक सुफी संत भारतात आले.तेराव्या शतकात महंमद तुघलक याने दौलताबादला राजधानी केल्यानंतर अनेक सुफी संत येथे आले आणि त्यांनी शांती आणि सद्भाव निर्माण केला. त्यामुळे मराठवाड्याला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते.येथे सुफी संतांची मोठी परंपरा आहे. हजरत जर जरी जर बक्ष, हजरत गंज ए रवाँ, हजरत मोमीन आरिफ, हजरत बाबा शाह मुसाफिर, हजरत बाबा सईद पिलंग पोश, हजरत शहानूरमियाँ हमवी, असे औरंगाबाद, दौलताबाद, खुलताबाद परिसरात अनेक मोठे सुफी संत होऊन गेले. डॉ. आजम यांनी सांगितले की, मराठवाड्यातून खºया अर्थाने सुफीवादाला मोठी चालनामिळाली.