शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

आजच्या काळात संतुलित जीवनशैली हेच आरोग्याचे सूत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:52 IST

वाढते ताणतणाव, बदलती जीवनशैली, जंक फूड आणि आहाराच्या वेळा न पाळणे इ. मधुमेह उद्भवण्याची कारणे असून जीवनशैली संतुलित राखण्यासह व्यायामाबाबत सजग राहावे, असे सल्ला मधुमेह तज्ज्ञ डॉ. राजेश सेठिया यांनी जागतिक मधुमेह दिनाच्या पार्श्वभूमीवर तरुणांसह महिलांना दिला.

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वाढते ताणतणाव, बदलती जीवनशैली, जंक फूड आणि आहाराच्या वेळा न पाळणे इ. मधुमेह उद्भवण्याची कारणे असून जीवनशैली संतुलित राखण्यासह व्यायामाबाबत सजग राहावे, असे सल्ला मधुमेह तज्ज्ञ डॉ. राजेश सेठिया यांनी जागतिक मधुमेह दिनाच्या पार्श्वभूमीवर तरुणांसह महिलांना दिला.‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत डॉ. राजेश सेठिया म्हणाले की, जगभरात १४ नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा कला जातो. मधुमहाबाबत जनजागृती करण्यासाठीदरवर्षी एक कल्पना वर्षभर राबविली जाते. यंदा ‘मधुमेह आणि स्त्री’ ही थीम घेण्यात आली आहे. जगभरात ९ कोटी महिलांना मधुमेह आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यासह त्यांना अधिक सजग करण्याचे उद्दिष्ट जागतिक मधुमेह फेडरेशनचे आगामी वर्षभर राहणार आहे. तसेच आरोग्यदायी भविष्य आमचा अधिकार हे ब्रीद घेऊन या आजाराबाबत सर्वसामान्यांमध्ये पुढील वर्षभर जनजागृती केली जाणार आहे.महाराष्ट्रात मधुमेहाचे ६० लाख रुग्ण असून, याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या नागरीकरणामुळे अनेक समस्या उद्भवत असून, त्यातूनच ताणतणाव वाढत आहेत. ताणतणावांमुळे मानवी शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते आणि त्यांचा परिणाम शरीरावर होतो. यातूनच मधुमेहासारखा आजार जडतो. या आजारातून पुढे हृदयरोग, अर्धांगवायू, लैंगिक दुर्बलता यांसारख्या आजारांना निमंत्रण मिळते. मधुमेहाचा संबंध थेट बदलत्या जीवनशैलीशी असून, चांगल्या जीवनशैलीबाबत शहरी भागासह ग्रामीण भागात जनजागृतीची गरज आहे. मधुमेहाच्या आजाराबाबत अनेकजण अनभिज्ञ असतात. त्यामुळे धोकादायक पातळीवर आल्यानंतर प्रामुख्याने त्यावर उपचार केले जातात. तरुणांनी आपल्या आरोग्याबाबत सजग राहिले पाहिजे. टीव्ही आणि मोबाईल संस्कृतीमुळे तरुणांचेही व्यायामाकडे दुर्लक्ष होत आहे. मैदानी खेळांसह योगासन व इतर प्रकारचे व्यायाम निरोगी शरीरासाठी केव्हाही चांगलेच. त्यासाठी तरुणांसह महिलांनीही व्यायामाला प्राधान्य दिले पाहिजे. तसेच व्यसनापासून दूर राहिले, तर कुठलाही आजार होणार नाही.चंदीगड मधुमेहाची राजधानीचंदीगड ही मधुमेह आजाराची राजधानी झाली असून, १३. ५ टक्के लोकांना मधुमेहाची लागण झाली आहे. तर १४. ५ टक्के मधुमेहाच्या उंबरठ्यावर आहेत. महाराष्ट्र हा दुस-या क्रमांकावर असून, १३ टक्के लोकांना मधुमेह आजार जडलेला आहे. तर त्यापेक्षा अधिक लोक हे याच्या उंबरठ्यावर आहेत. याचे गांभीर्य ओळखून याबाबत जनजागृतीची गरज डॉ. सेठिया यांनी व्यक्त केली आहे.