शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

आजपासून ‘आॅन दी स्पॉट’ प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 01:08 IST

यंदा अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेचा पार फज्जा उडाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : यंदा अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेचा पार फज्जा उडाला आहे. आतापर्यंत चार प्रवेश फेºया राबविल्यानंतरही ९ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. या विद्यार्थ्यांसाठी उद्या सोमवारपासून ‘प्रथम येणाºयास प्रथम प्रवेश’ ही फेरी राबविण्यात येणार आहे. रविवारी सायंकाळी शिक्षण विभागाच्या वेबसाइटवर महापालिका कार्यक्षेत्रातील महाविद्यालयनिहाय प्रवेशांच्या रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात आला आहे.औरंगाबादेत यंदा पहिल्यांदाच जूनपासून केंद्रीय पद्धतीने अकरावीसाठी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. प्रवेशाच्या आतापर्यंत चार फेºया राबविण्यात आल्या. त्यानंतरही मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्यामुळे पाचवी विशेष फेरी राबविण्यात आली. तरीदेखील ९ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने उद्या २१ ते २८ आॅगस्टदरम्यान ‘प्रथम येणारास प्रथम प्रवेश’ ही फेरी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या फेरीसाठी विद्यार्थ्यांचे गुणवत्तेनुसार तीन गट करण्यात आले आहेत. गट क्रमांक १ मध्ये ज्या विद्यार्थ्यांना ८० ते १०० टक्के गुण मिळाले आहेत. गट क्रमांक २ मध्ये ज्या विद्यार्थ्यांना ६० ते १०० टक्के गुण मिळाले आहेत आणि गट क्रमांक ३ मध्ये दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.पहिल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी रविवारी रिक्त जागांची यादी जाहीर झाली. त्यानंतर उद्या २१ आॅगस्ट रोजी विद्यार्थ्यांना सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आॅनलाइन अर्ज क्रमांक दोन भरायचा आहे. हा अर्ज भरून झाल्यावर २१, २२ आॅगस्टला विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर प्रवेश दिला जाणार आहे. या गटातील विद्यार्थ्यांना २२ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजेपर्यंत प्रवेश घेता येईल. २२ आॅगस्ट रोजी गट क्रमांक २ साठी रिक्त जागांचा तपशील जाहीर होईल. २३ आॅगस्टपर्यंत या गटातील विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. २४ आॅगस्ट रोजी गट क्रमांक ३ साठी रिक्त जागा जाहीर केल्या जातील. २६ आॅगस्ट रोजी या गटातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे वाटप होईल व ते विद्यार्थी २८ आॅगस्ट रोजी प्रवेश घेतील.