शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आज ‘लोकमत’ सूरोत्सव; दिवाळीच्या पूर्वसंध्येला महेश काळेंची संगीत मैफल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 16:40 IST

केवळ निमंत्रित आणि पासधारकांसाठी असलेल्या या कार्यक्रमासाठी ‘लोकमत’तर्फे चार दिवसांपासून मोफत पास वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी येताना सोबत पास घेऊन येणे आवश्यक आहे.

औरंगाबाद : शहरवासीयांसाठी सतत विविध उपक्रम राबविणाऱ्या ‘लोकमत’तर्फे दीपोत्सवाच्या पूर्वसंध्येला आज सूरांच्या मैफलीचे आयेाजन करण्यात आले आहे. ख्यातनाम गायक महेश काळे यांच्या जादूई आवाजांची संगीत मैफल आज, शुक्रवारी सायंकाळी ‘लोकमत भवन’ येथे रंगणार आहे. खास निमंत्रित आणि पासधारकांसाठी होत असलेल्या या कार्यक्रमाची शहरवासीयांना उत्सुकता आहे.

दरवर्षी दिवाळीनिमित्त ‘लोकमत’तर्फे विविध अनोख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. शहरवासीयांच्या यंदाच्या दिवाळीची सुरुवात संगीतमय व्हावी, यासाठी ‘लाेकमत’च्या वतीने दीपोत्सवाच्या पूर्वसंध्येला २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता लोकमत भवन येथे ख्यातनाम गायक महेश काळेंच्या सूरोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या संगीत मांदियाळीबद्दल रसिक श्रोत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

केवळ निमंत्रित आणि पासधारकांसाठी असलेल्या या कार्यक्रमासाठी ‘लोकमत’तर्फे चार दिवसांपासून मोफत पास वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी येताना सोबत पास घेऊन येणे आवश्यक आहे. सर्वसामान्य रसिक श्रोत्यांना लोकमत भवनच्या मागील बाजूला असलेल्या गेटमधून प्रवेश दिला जाईल, तर व्हीआयपींना मुख्य गेटने प्रवेश असेल. या कार्यक्रमासाठी ‘लोकमत’चे रिगल लॉन, जालना रोडवरील शिवा ट्रस्टची जागा (इंडियन एअरलाईनचे जुने कार्यालय) आणि एमजीएम परिसरातील प्रियदर्शनी उद्यानालगत वाहनतळाची व्यवस्था केली आहे.

पार्किंगची व्यवस्था तीन ठिकाणीएमजीएम परिसरातील प्रियदर्शनी उद्यानालगत, जालना रोडवरील शिवा ट्रस्टच्या जागेवर (एअर इंडियाचे जुने कार्यालय) आणि ‘लोकमत’च्या रिगल लॉन अशा तीन ठिकाणी वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

केवळ पासधारकांनाच प्रवेशलोकमत दिवाळी सूरोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन केवळ निमंत्रित आणि पासधारकांसाठीच आहे. यामुळे या कार्यक्रमास केवळ पासधारकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. पावसाचा अंदाज पाहता श्रोत्यांनी सोबत छत्री आणावी.

दिवाळीचा आनंद द्विगुणित‘लोकमत’ नेहमीच समाजोपयोगी नवनवीन कार्यक्रम घेत असतो. या वर्षी औरंगाबादकरांसाठी ‘लोकमत’ची अनोखी दिवाळी भेट गायक महेश काळे यांच्यासोबत रंगणार आहे. दिवाळी सूरोत्सव म्हणजे औरंगाबादकरांसाठी संगीताची मांदियाळी असून, या कार्यक्रमासाठी संगीतप्रेमींनी उपस्थित राहून या वर्षीच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा. या कार्यक्रमासाठी आम्ही ‘लोकमत’सोबत जोडल्याचा आनंद आहे.- महेंद्र बंब, दीप ट्रेडर्स (प्रीमियम ड्रायफ्रुट स्टोअर)

टॅग्स :Mahesh Kaleमहेश काळेAurangabadऔरंगाबाद