शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका, जि.प.त विजयी होण्यासाठी पक्षात जे येतील, त्या सर्वांना घ्या; एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 12:01 IST

निवडणुकीपूर्वी एक ॲप पदाधिकाऱ्यांना देण्यात येईल. सर्वांनी त्याद्वारे मतदारांची माहिती संकलित करावी.

छत्रपती संभाजीनगर : आता लोकसभा निवडणुकीशिवाय कोणत्याही मोठ्या निवडणुका नाहीत. त्यामुळे आता फक्त महापालिका, जि. प., नगरपालिकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी पक्षात जे येतील, त्यांना घ्या. मतदार याद्या बारकाईने चाळून आपले मतदार शोधा. उमेदवारी मिळणारा चांगला, न मिळालेला वाईट; असा मुद्दा मनात न धरता, जो उमेदवार असेल तो महायुतीचा असेल हे सूत्र समोर ठेवून निवडणुका लढण्याचे आवाहन करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये मराठवाड्यातील जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, तालुकाप्रमुखांपर्यंतच्या पदाधिकाऱ्यांना भरगच्च मेळावा शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट, आ. अर्जुन खोतकर, आ. प्रदीप जैस्वाल, आ. विलास भुमरे, आ. संतोष बांगर, हेमंत पाटील आदींची उपस्थिती होती. निवडणुकीपूर्वी एक ॲप पदाधिकाऱ्यांना देण्यात येईल. सर्वांनी त्याद्वारे मतदारांची माहिती संकलित करावी. आपल्या मतदारांची नावे यादीत आहेत की नाहीत, हे तपासावे. असेही शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. मेळाव्यानंतर शिंदे यांनी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर व महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांच्याकडून शहर पाणीपुरवठा योजना व इतर विकासकामांची माहिती जाणून घेतली.

जीआरमुळे ओबीसींवर अन्याय होणार नाहीविधान परिषद विरोधी पक्षनेता प्रकरणी पत्रकारांनी विचारले असता शिंदे म्हणाले, विरोधकांना जनतेने जागा दाखविली आहे. गाठीभेटी घेण्याचे काम विरोधकांचे आहे. आम्ही काम करतो. हैदराबाद गॅझेट व मनोज जरांगे यांच्या दसऱ्यानंतरच्या भूमिकेप्रकरणी विचारलेल्या प्रश्नावर शिंदे म्हणाले, इतर समाजांवर कुठलाही अन्याय होणार नाही. मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळतील. जीआरमुळे ओबीसींवर देखील अन्याय होणार नाही. एनडीएकडे बहुमत आहे, त्यामुळे उपराष्ट्रपतिपदी सी. पी. राधाकृष्णन् निवडून येतील, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तराप्रसंगी सांगितले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरShiv Senaशिवसेना