शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

मनपावरच गुन्हे दाखल करण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 01:11 IST

मनपा प्रशासन याचाच आधार मागील चार महिन्यांपासून घेत आहे. आमखास तलावाजवळील कमल तलाव ५० लाख रुपये खर्च करून स्वच्छ करण्यात आला. त्याच तलावात महापालिका प्रशासन कचरा टाकत असल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. आता खंडपीठानेच महापालिकेवर घनकचरा नियमावलीनुसार गुन्हे दाखल करायला हवेत.

मुजीब देवणीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कचरा प्रश्नात महापालिकेने घनकचरा नियमावली धाब्यावर बसविली आहे. नियमानुसार मनपाला कचरा जाळता येत नाही. जमिनीत खड्डे करून पुरता येत नाही. जलस्रोतामध्ये कचरा नेऊन टाकता येत नाही. मनपा प्रशासन याचाच आधार मागील चार महिन्यांपासून घेत आहे. आमखास तलावाजवळील कमल तलाव ५० लाख रुपये खर्च करून स्वच्छ करण्यात आला. त्याच तलावात महापालिका प्रशासन कचरा टाकत असल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. आता खंडपीठानेच महापालिकेवर घनकचरा नियमावलीनुसार गुन्हे दाखल करायला हवेत.शहरात १६ फेब्रुवारीपासून अभूतपूर्व अशी कचराकोंडी निर्माण झाली आहे.५० लाख रुपये खर्चऐतिहासिक कमल तलावाला गतवैभव मिळावे म्हणून चार वर्षांपूर्वी शासनाने ५० लाख रुपयांचा निधी दिला होता. या निधीतून गाळ काढणे, तलावातील घाण, केरकचरा काढण्याचे काम महापालिकेने आपल्या पद्धतीने केले. तलाव विकसित करण्याचे काम झाले नाही. तलावातील पाण्यावर सध्या मोठ्या प्रमाणात जलपर्णी आलेली आहे. तलावाच्या बाजूला नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस लावण्यात आले आहेत. नागरिक सायंकाळी, सकाळी येथे शुद्ध हवा मिळते म्हणून बसतात.डम्पिंग यार्डकमल तलावात मागील तीन महिन्यांपासून मध्यरात्री कचरा आणून टाकण्याचे पाप या भागातील चतुर्थश्रेणी कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, वॉर्ड अधिकारी करीत आहेत. तीन महिन्यांत कमल तलावाची अवस्था डम्पिंग यार्डसारखी झाली आहे. मनपाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवरच आता घनकचरा नियमावलीनुसार गुन्हे दाखल करण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न