शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मशागती आटोपल्या, बियाणांच्या दरात १० टक्क्यांनी वाढ झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 18:20 IST

शासनाने हमीभावात किरकोळ वाढ केली, तर बियाण्यांच्या दरात १० टक्क्यांची वाढ केल्याने शेतकऱ्यांत नाराजी

गंगापूर : तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी मशागतीची कामे जवळपास पूर्ण केली असून, पेरणीची तयारी सुरू झाली आहे. मात्र, यावर्षी बियाण्यांच्या दरात १० टक्क्यांनी वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. परिणामी, खरीप पिकांचे नियोजन बिघडत असून शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.

अलीकडच्या काळात शेतकऱ्यांना कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यामध्येच उत्पादनासाठी लागणारे बियाणे, खते, औषधे, मजुरी आदींचा खर्च वाढला असतानाच बाजारात अपेक्षित दर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आता शेती नकोशी होत आहे. दुसरीकडे शासनाने हमीभावात किरकोळ वाढ केली, तर बियाण्यांच्या दरात १० टक्क्यांची वाढ केल्याने शेतकऱ्यांच्या नाराजीचे वातावरण पसरले आहे. त्यातच पावसाचा मागमूस नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये अधिकच भर पडली असून पेरणीचे नियोजन पार कोलमडले आहे.

मजुरी वाढली, कर्ज मात्र वेळेवर नाही...शेतीसाठी लागणाऱ्या मजुरांची उपलब्धता कमी होत असून दर दिवसागणिक मजुरीचे दर वाढत आहेत. काही ठिकाणी मजुरी देऊनही मजूर मिळत नाहीत, अशी अवस्था आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मजुरांच्या वेळापत्रकानुसार, शेतीच्या मशागतीचे नियोजन करावे लागत आहे. दुसरीकडे, शेतकऱ्यांना वेळेवर बँकेकडून पीककर्जही मिळत नसल्यामुळे आर्थिक नियोजन कोलमडत आहे.

खर्च वाढला, उत्पादनाची मात्र खात्री नाही...शेतकरी महागड्या आणि नामांकित कंपन्यांचे बियाणे अधिकृत कृषी केंद्रातून खरेदी करतात, तरीही अनेक वेळा उत्पादन निघाल्यावर बाजार व्यवस्थेकडून दर पाडले जातात. परिणामी, शेतकऱ्यांची फसवणूक होते. अशा अनुभवामुळे शेतकरी मानसिक तणावात जातात आणि पुन्हा कर्जाच्या विळख्यात अडकतात.

अवकाळी बरसल्यानंतर मान्सून दीर्घ रजेवर...मे महिन्यात अवकाळी पाऊस जोरदार बरसला. या पावसामुळे काही शेतकऱ्यांच्या कापणीला आलेल्या शेतीचे, कापून ठेवलेल्या चाऱ्याचे नुकसान केले, तर काही शेतकऱ्यांच्या आशा पावसाने पल्लवित केल्या. दुसरीकडे शेतीच्या मशागतीला लागलेल्या शेतकऱ्यांची कामे आता पावसाने विश्रांती घेतल्याने खोळंबली आहेत. गेल्या १० दिवसांपासून पावसाने रजा घेतल्याने शेतकरी मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. पाऊस नियमित झाल्यानंतरच पेरणी करण्यास कृषी विभागाने शेतकऱ्यांना सांगितले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर