शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

‘टिकटॉक’मुळे मिळतो कलात्मकतेला वाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 23:58 IST

अल्पावधीतच लोकप्रिय झालेले टिकटॉक अ‍ॅप अचानक बंद झाल्यामुळे हे अ‍ॅप ज्यांच्याकडे नाही, त्यांची उत्सुकता अजूनच वाढली आहे. औरंगाबादकर तरुणाईही या निर्णयामुळे काही प्रमाणात नाराज झाली आहे. कला क्षेत्रातील तरुणाईला आपली कला सादर करण्यासाठी हे अ‍ॅप फारच उपयुक्त होते, अशी प्रतिक्रिया काही तरुणांनी दिली.

ठळक मुद्देसोशल मीडिया : कुणासाठी ‘टाईमपास’, तर कुणासाठी महत्त्वाचे होते ‘टिकटॉक’ अ‍ॅप

औरंगाबाद : अल्पावधीतच लोकप्रिय झालेले टिकटॉक अ‍ॅप अचानक बंद झाल्यामुळे हे अ‍ॅप ज्यांच्याकडे नाही, त्यांची उत्सुकता अजूनच वाढली आहे. औरंगाबादकर तरुणाईही या निर्णयामुळे काही प्रमाणात नाराज झाली आहे. कला क्षेत्रातील तरुणाईला आपली कला सादर करण्यासाठी हे अ‍ॅप फारच उपयुक्त होते, अशी प्रतिक्रिया काही तरुणांनी दिली.जगभरातील १०० क ोटींपेक्षाही अधिक लोक टिकटॉक अ‍ॅप वापरत आहेत. नुकत्याच झालेल्या निर्णयामुळे गुगलने गुगल स्टोअरवरून टिकटॉक अ‍ॅप काढून टाकले. यामुळे आता नव्याने हे अ‍ॅप डाऊनलोड करता येणार नाही; पण ज्यांच्याकडे हे अ‍ॅप आधीपासूनच आहे, त्यांच्यावर मात्र या निर्णयाचा काहीही परिणाम झालेला नसून त्यांचे अ‍ॅप सुरळीतपणे सुरू आहे. टिकटॉक बंद होताच भारतातील नेटीझन्सनी या अ‍ॅपबाबत आॅनलाईन सर्च करायला सुरुवात केली असून, गुगल सर्च ट्रेंडस्ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या माहितीनुसार ‘टिकटॉक अ‍ॅप डाऊनलोड’ असे शब्द सर्वात जास्त सर्च करण्यात आले आहेत.याबाबत सांगताना काही तरुणांनी सांगितले की, कला क्षेत्रातील लोकांसाठी हे अ‍ॅप अत्यंत उपयुक्त आहे. कला क्षेत्रातील ‘स्ट्रगलर्स’चे प्रमाण मोठे असून, या क्षेत्रातील तरुणाईला फक्त एका संधीची गरज आहे; पण प्रत्येकालाच ही संधी मिळते असे नाही. त्यामुळे कला क्षेत्रातील अनेक तरुण आपल्या लहान-लहान ध्वनिचित्रफिती (व्हिडिओ) बनवून ते सोशल मीडियाच्या साहाय्याने हजारो लोकांपर्यंत पोहोचवतात. यातून किती जणांना संधी मिळते, हे आमच्यासाठी महत्त्वाचे नसून आम्हाला आमची कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळते आहे, हेच महत्त्वाचे असल्याचे काही तरुणांनी सांगितले.प्रतिक्रिया-१. कला सादर करण्याची संधी-मी पत्रकारितेची विद्यार्थिनी आहे. मला सूत्रसंचालन करण्याचीसुद्धा आवड आहे. त्यामुळे मी माझे काही छोटे-छोटे व्हिडिओज बनवून ते सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहोचवते. माझे अनेक मित्र- मैत्रिणीही या अ‍ॅपचा अशाच प्रकारे उपयोग करतात. हे अ‍ॅप मला खूप आवडते, कारण यामुळे कला सादर करण्यासाठी आणि कलात्मकतेसाठी खूप वाव मिळतो. त्यामुळे आमच्या सारख्या हौशी तरुणाईसाठी उपयुक्त असणारे हे अ‍ॅप का बंद केले, असे वाटते.- अर्चना साळवी२. गमतीदार व्हिडिओज करणे आवडते-टिकटॉक अ‍ॅपचा मला फार काही उपयोग होत आहे, असे नाही; पण सहज करमणूक म्हणून हे अ‍ॅप चांगले आहे. या अ‍ॅपचा उपयोग करून काही गमतीदार व्हिडिओज तयार करणे मला आवडते. नव्याने अ‍ॅप डाऊनलोड करणे बंद झाले म्हणून थोडे वाईट वाटले, पण त्यामुळे फार काही फरक पडेल असे वाटत नाही.- वेदिका देशपांडे

टॅग्स :InternetइंटरनेटSocial Mediaसोशल मीडिया