शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

माझी रक्षा शेतात टाकून त्यावर पाच वृक्ष लावा; शिक्षकाने मृत्यूनंतरही दिली अनमोल शिकवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 20:09 IST

हनुमंतराव पांढरे यांनी जिवंत असतानाच काही वर्षांपूर्वी आपल्या मृत्यूनंतर शेवटची इच्छा कुटुंबाला बोलून दाखविली होती, तसेच ती पूर्ण करण्याचे वचन त्यांनी घेतले होते.

ठळक मुद्देसेवानिवृत्त मुख्याध्यापकाची शेवटची इच्छा कुटुंबियांनी केली पूर्ण

केऱ्हाळा : माझा मृत्यू झाला तर, माझी रक्षा नदीच्या पाण्यात टाकून प्रदूषण न करता आपल्या शेतात टाकून त्यावर पाच वृक्ष लावा, अशी शेवटची इच्छा केऱ्हाळा येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक हनुमंतराव देवराव पांढरे यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी ही इच्छा पूर्ण केली असून, शेतात रक्षा विसर्जित करून त्यावर पाच झाडे लावण्यात आली आहेत.

हनुमंतराव पांढरे यांनी जिवंत असतानाच काही वर्षांपूर्वी आपल्या मृत्यूनंतर शेवटची इच्छा कुटुंबाला बोलून दाखविली होती, तसेच ती पूर्ण करण्याचे वचन त्यांनी घेतले होते. हनुमंतराव यांचे ९ मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. तीन दिवसांनंतर त्यांच्या रक्षा विसर्जनासाठी नातेवाईक जमा झाले होते. अनेकांनी त्यांची रक्षा एखाद्या पवित्र स्थानी नदीत विसर्जित करण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यांच्या मुलांनी वडिलांनी जिवंतपणी व्यक्त केलेली शेवटची इच्छा नातेवाइकांना सांगितली. यानंतर कुटुंबियांनी ही रक्षा स्वत:च्या शेतात विसर्जित करून त्यावर पाच वृक्ष लावले. उपस्थित अनेक नातेवाइकांनी या उपक्रमाची स्तुती केली.

सिल्लोड तालुक्यातील संस्कृतचे पहिले पीएच.डी.दिवंगत हनुमंतराव पांढरे हे शेतकरी कुटुंबात जन्माला आले होते. त्यांनी १९७६ ला एमए, एमएड पूर्ण केले. १९७७-७९ ला संस्कृतमध्ये पुणे विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. मिळविली. सिल्लोड तालुक्यातून संस्कृतमध्ये पीएच.डी. मिळविणारे ते पहिले व्यक्ती ठरले. त्यानंतर ते माणिकनगर येथील सिद्धेश्वर हायस्कूलमध्ये पहिले मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले होते. त्यांनी शिक्षणाबरोबरच कुस्तीची मैदानेही गाजविले होती. सलग पाच-पाच तास पोहण्याची त्यांची ख्याती होती. त्यांच्या मृत्यूने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणAurangabadऔरंगाबाद