शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

थरारक ! नव्या कोऱ्या कारला धक्का लागला; संतप्त तरुणांनी रस्त्यात गाडी अडवून काचा फोडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 15:37 IST

नव्या कोऱ्या कारला धक्का लागल्याचे पाहून दोन्ही तरुण संतप्त झाले

ठळक मुद्देतडजोड झाल्यामुळे पोलिसांत तक्रार नाही

औरंगाबाद : नव्या कोऱ्या विनानंबरच्या कारला दुसऱ्या कारचालकाने कट मारल्याचा राग आल्यामुळे कारमधून उतरलेल्या दोन तरुणांनी बॅटने सिनेस्टाईलने दुसऱ्या कारच्या समोरील आणि मागील काचा फोडल्याची थरारक घटना शुक्रवारी दुपारी शासकीय दूध डेअरीजवळ झाली. यावेळी कारमधून प्रवास करणारे कुटुंब भयभीत झाले. यावेळी वाहतूक पोलिसांनी तेथे धाव घेऊन हल्ला करणारे आणि अन्य लोकांना क्रांती चौक पोलिसांच्या ताब्यात दिले आणि कोंडलेली वाहतूक सुरळीत केली .

एखाद्या सिनेमातील प्रसंगाप्रमाणे शुक्रवारी दुपारी जनार्धन लक्ष्मण कोल्हे (रा. मंठा रोड, जालना) हे त्यांचा मावसभाऊ, भावजय आणि लहान मुलीसह महावीर चौकाकडून जालन्याकडे कारने (एमएच ४६ एन ५०९७) जात होते. त्यांच्यासोबतच विनाक्रमांकाची स्कोडा कंपनीच्या पांढऱ्या कारमधून शेख जमील (उस्मानपुरा) आणि अन्य एक तरुण जात होते. या दरम्यान त्यांच्या कारला कोल्हे यांच्या कारचा धक्का लागला. नव्या कोऱ्या कारला धक्का लागल्याचे पाहून दोन्ही तरुण संतप्त झाले आणि त्यांनी पुढे शासकीय दूध डेअरी चौकाजवळ कोल्हे यांना कार रोखण्यास सांगितले. कोल्हे यांनी कार थांबविताच कारमधून उतरलेल्या दोन तरुणांनी क्रिकेट बॅटने कोल्हे यांच्या कारवर जोरदार हल्ला चढवून कारच्या सर्व काचांचा चुरडा केला. यामुळे कोल्हे यांच्या कारमधील त्यांचे नातेवाईक महिला आणि लहान मुलीने आरडाओरड केली. या घटनेमुळे दूध डेअरीसमोर रस्त्यावर वाहनचालकांनी वाहने थांबविल्यामुळे वाहतूक थांबली.

क्रांती चौक पोलिसांनी ताब्यात घेऊन नेले ठाण्यातदूध डेअरी चौकात वाहतूक नियमन करणाऱ्या सहायक फौजदार जाधव, गायकवाड, हवालदार अंकुश टेकाळे यांनी तेथे धाव घेतली आणि घटनेची माहिती क्रांती चौक पोलिसांना कळविली. पोलिसांनी तेथे धाव घेऊन दोन्ही कार आणि त्यातील लोकांना ठाण्यात नेले.

...अन्‌ माफी मागून दिली नुकसानभरपाई ?कार फोडणाऱ्या तरुणांनी पोलीस ठाण्यात गेल्यावर कोल्हे यांची माफी मागून त्यांच्याविरुद्ध तक्रार करू नका, अशी विनंती केली. एवढेच नव्हे तर त्यांच्या कारच्या केलेल्या नुकसानीच्या भरपाईविषयी आपसांत तडजोड केल्याने कोल्हे यांनी त्या कारचालकाविरुद्ध तक्रार नसल्याचे पोलिसांना लिहून दिल्याचे पोलीस निरीक्षक डॉ. जी. एच. दराडे यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद