शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

थरारक ! दारूच्या पैशांवरून मित्रांमध्ये वाद; अवघ्या तीन सेकंदांत चाकूने भोसकून केला घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 18:59 IST

Murder in Aurangabad : पळत येत पाठीमागून चाकूने भोसकले आणि माघारी पळून गेला.

औरंगाबाद : दारू पिण्यावरून झालेल्या वादातून अवघ्या तीन सेकंदांत विश्वास वॉइन शॉपीच्या काउंटरवरच एकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. बजरंग चौकातील वाइन शॉपमध्ये रविवारी रात्री ९ वाजून १४ मिनिटांनी ही थरारक घटना घडली. खून केल्यानंतर आरोपी पळून गेल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

सिडको पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बजरंग चौकातील वाइन शॉपीत दारू विकत घेण्यासाठी सिद्धार्थ रंगनाथ हिवराळे (३५, रा. मथुरानगर, एन-६, सिडको) हा ९ वाजून १२ मिनिटांनी दाखल झाला. त्याच्या पाठीमागेच विशाल आगळे ९ वाजून १४ मिनिटांनी पळतच आला. त्याने पळत येत सिद्धार्थला चाकूने भोसकले आणि माघारी पळून गेला. अवघ्या तीन सेकंदांची ही घटना वॉइन शॉपीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. सिद्धार्थ आणि विशाल हे दोघे मित्र असून, विशाल हा दारू पिऊन बजरंग चौकात रात्री ८.३० वाजेच्या दरम्यान शिव्या देत फिरत होता. सिद्धार्थ तेथे आल्यानंतर दोघांमध्ये दारूच्या पैशावरून वाद झाले. त्यानंतर सिद्धार्थ दारू घेण्यासाठी दुकानात जाताच विशालने पाठीमागे पळत येऊन चाकू खुपसला. एकाच घावात सिद्धार्थ खाली कोसळला. उपस्थितांनी तात्काळ त्यास एमजीएम रुग्णालयात दाखल केले. तेथे काही वेळ उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात हलविला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारीबजरंग चौकात खून झाल्याची घटना वाऱ्याच्या वेगाने शहरात पसरली. सिडको पोलीस ठाण्यातील विशेष पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर अवघड तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक संभाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ आणि उपायुक्त दीपक गिऱ्हेही घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. याशिवाय उपनिरीक्षक अशोक अवचार, रतन डोईफोडे, रमेश राठोड यांच्यासह गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक गजानन सोनटक्के यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

आरोपीच्या शोधार्थ दोन पथकेखून करून पळून गेलेला संशयित आरोपी विशाल आगळे हा मोंढा नाका परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. त्याला पकडण्यासाठी सिडको ठाण्याच्या विशेष पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर अवघड आणि गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक गजानन सोनटक्के यांच्या टीम रवाना झाल्या. सकाळपर्यंत आरोपीला अटक केली जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली. 

हेही वाचा :- 'तुझ्यासाठी मला देवाने पाठविले'; महिलेवर अत्याचारानंतर पुजाऱ्याचा मुलीवरही अतिप्रसंग- खळबळजनक ! प्राध्यापकाचा राहत्या घरात गळा चिरून निर्घृण खून

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद