शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

सिल्लेखाना चौकात थरार ; जुन्या वादातून कार अडवून केला तलवारीने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 17:54 IST

तुंबळ हाणामारीत दोन्ही गटांतील चार जण जखमी

औरंगाबाद : जुन्या वादातून सिल्लेखाना चौकात दोन गटांत तलवारीने हाणामारी झाली. यात चार जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि.३०) दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. गस्तीवरील पोलिसांच्या दंगाकाबू पथकाने हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.

या हल्ल्यात चार जण जखमी झाले असून, जखमींना पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परमेश्वर वाघ (४५, रा. आडगाव-निपाणी), नितीन प्रकाश जाधव (४२, रा. रेणुकानगर, शिवाजीनगर) यांच्यात वर्षभरापूर्वी शिवाजीनगर भागात वाद झाला होता. त्यावेळी वाघने  जाधववर प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी जवाहरनगर ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. गुरुवारी न्यायालयात सुनावणी असल्यामुळे  वाघ हा  रामेश्वर तुकाराम गवारे, शार्दूल सुरेश गावंडे यांच्यासोबत कारने (एमएच-२० बीएन-६८०६) जिल्हा न्यायालयात आले होते, तर नितीन जाधव हादेखील आपल्या साथीदारासोबत न्यायालयात कारने (एमएच-२० एच-१२११) आला होता. 

न्यायालयात पुढची तारीख मिळाल्याने वाघ आणि त्याचे साथीराद कारमधून  वरद गणेश मंदिर चौक, सिल्लेखानामार्गे जात होते. त्यावेळी कारमधून पाठलाग करणाऱ्या जाधवने वाघला सिल्लेखाना चौकात अडविले. त्यानंतर आपल्या जवळील तलवारीने वाघ याच्यावर हल्ला केला. या घटनेत परमेश्वर वाघ आणि त्याच्यासोबत असलेले रामेश्वर गवारे, शार्दूल गावंडे हे दोघे जखमी झाले. माहिती मिळताच क्रांतीचौक ठाण्याचे सहायक निरीक्षक राहुल सूर्यतळ, उपनिरीक्षक महादेव गायकवाड, सोनवणे यांच्या पथकाने धाव घेऊन जखमींना उपचारासाठी दाखल केले. 

पोलिसांमुळे अनर्थ टळलासिल्लेखाना चौकात ही हाणामारी सुरू असताना गस्तीवर असलेले सिडको विभागाचे दंगा नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झाले. दंगा नियंत्रण पथकातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ कारवाई करीत हाणामारी करणाऱ्या आरोपींना पकडले. दंगा नियंत्रण पथक वेळीच घटनास्थळी दाखल झाले नसते, तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी माहिती क्रांतीचौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक उत्तम मुळक यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल