शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गावर थरार! पंजाब येथील तिहेरी हत्याकांडातील आरोपींच्या आवळल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 20:00 IST

अवघ्या काही दिवसांवर लग्न असलेल्या तरुणी आणि इतर दोघांची हत्या करून आरोपींनी पंजाबमधून पलायन केले होते. 

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी आज सकाळी एक धाडसी मोहीम राबवत फिरोजपूर पंजाब येथील तिहेरी हत्याकांडात सहभागी असलेल्या सात खतरनाक आरोपींना समृद्धी महामार्गावर कारवाई करत ताब्यात घेतले. अवघ्या काही दिवसांवर लग्न असलेल्या तरुणी आणि इतर दोघांची हत्या करून आरोपींनी पंजाबमधून पलायन केले होते. 

पहाटे ३ वाजता पंजाब पोलिसांच्या संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कृती दल (एजीटीएफ – ॲण्टी गॅंगस्टर टास्क फोर्स) अतिरिक्त महासंचालक प्रमोद बान यांनी पोलिस आयुक्त प्रविण पवार यांना हत्याकांडातील सहा आरोपी नांदेड येथून समृद्धी महामार्गावरुन मुंबईकडे जात असल्याची माहिती दिली. आरोपींबाबत माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप गुरमे, सिडको ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या नेतृत्वाखालील १० अधिकारी आणि ४० कर्मचाऱ्यांची टीम बुलेटप्रुफ जॅकेटसह सज्ज झाली. आरोपी शस्त्रधारी असतानाही दक्ष पोलिसांनी समृद्धी महामार्गावर सापळा रचला. सकाळी ५. ४५ मिनिटांनी  धाडसी कारवाई करत भरधाव वेगात कारमधून ( MH 26 AC 5599 ) जाणाऱ्या पंजाब येथील सहाही आरोपींच्या पोलिसांनी शिताफीने मुसक्या आवळ्या. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद