शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार विद्यार्थ्यांनी दिली ‘एसपीआय’ परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 23:34 IST

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) प्रवेश घेण्यापूर्वी सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेच्या (एसपीआय) प्रवेशासाठी रविवारी शहरातील दोन केंद्रांवर घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी राज्यभरातून विद्यार्थ्यांनी हजेरी लावली़ एकूण ३ हजार ५२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली़

औरंगाबाद : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) प्रवेश घेण्यापूर्वी सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेच्या (एसपीआय) प्रवेशासाठी रविवारी शहरातील दोन केंद्रांवर घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी राज्यभरातून विद्यार्थ्यांनी हजेरी लावली़ एकूण ३ हजार ५२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली़सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेत प्रवेशासाठी राज्यातील चार केंद्र्रांमध्ये विविध टप्प्यांमध्ये परीक्षा घेण्यात आली़ ७ एप्रिलला नागपूर येथे निवृत्त मेजर जनरल विजय पवार यांच्या देखरेखीखाली १ हजार ४३८, कोल्हापूर येथे १३ एप्रिलला निवृत्त मेजर जनरल एस़ डी़ सोहनी यांच्या देखरेखीखाली १ हजार ४६९, पुणे येथे २८ एप्रिलला निवृत्त एअर कमांडर आऱ एच़ कपडे यांच्या देखरेखीखाली १ हजार ११५ जणांनी परीक्षा दिली़ चौथ्या टप्प्यामध्ये औरंगाबादेतील मौलाना आझाद महाविद्यालय आणि गोदावरी हायस्कूल येथे परीक्षा घेण्यात आली़ गृहरक्षक राजीव मानेकर यांच्या देखरेखीखाली गोदावरी हायस्कूल, तर अधीक्षक सुभाष हरकळ यांच्या देखरेखीखाली मौलाना आझाद महाविद्यालय ३ हजार ५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली़लेखी परीक्षेचा निकाल ८ ते १० मे दरम्यान घोषित करण्यात येणार आहे़ सदर निकाल संस्थेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे़ परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या साधारणत: ३०० ते ३२५ मुलांची निवड मुलाखतीसाठी करण्यात येणार आहे़ १३ ते १५ मे दरम्यान ‘क्विन मेडिटेक्निकल इन्स्टिट्यूट’ खडकी, पुणे आणि १८ ते २० मे औरंगाबादेतील सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेत मुलाखत घेण्यात येणार आहे. मुलाखतीद्वारे केवळ सात मुलांची अंतिम निवड करण्यात येईल, तर १० ते २० विद्यार्थ्यांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात येणार आहे़ यावर्षी निगेटिव्ह मार्किंगद्वारे गुणांकन असल्याने परीक्षार्थींचा चांगलाच कस लागणार आहे़

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षण