शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबार, अपहरण करणाऱ्या टोळीच्या शोधात तीन पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 13:33 IST

हुसेन कॉलनीतील नदीम पठाण रऊफ पठाण यांच्यावर देवानगरी भागात बुधवारी गोळीबार करून चार ते पाच गुंडांनी त्यांचे  कारमधून अपहरण केले.

ठळक मुद्देपळालेल्या आरोपींचा अद्याप लागेना थांगपत्ता

औरंगाबाद : बांधकाम कंत्राटदार तरुणावर गोळी झाडून त्यांचे अपहरण करण्याच्या सनसनाटी घटनेस ४८ तास उलटले आहेत; परंतु अद्याप आरोपी पोलिसांच्या हाती लागले नाहीत.  आरोपींना पकडण्यासाठी गुन्हे शाखेची तीन पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. 

हुसेन कॉलनीतील नदीम पठाण रऊफ पठाण यांच्यावर देवानगरी भागात बुधवारी गोळीबार करून चार ते पाच गुंडांनी त्यांचे  कारमधून अपहरण केले. इंधन संपल्यामुळे कारसह नदीम यांना आपत भालगाव येथे रस्त्यात जखमी अवस्थेत सोडून आरोपी पसार झाले होते. नदीम यांचा भाऊ वसीम यांच्या तक्रारीवरुन बुधवारी रात्री उशिरा सातारा ठाण्यात आरोपी फिरोज, त्याची तीन मुले आणि अन्य तीन अनोळखींवर  गुन्हा नोंदविण्यात  आला. पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. ही घटना समोर आल्यापासून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल देशमुख, उपनिरीक्षक विठ्ठल चासकर आणि उपनिरीक्षक विजय पवार यांची तपास पथके रवाना झाली.

आरोपींची मागणी १० लाखांचीरस्त्यावरील बांधकाम साहित्यावरून सादातनगर, पटेल प्राईडमधील रहिवासी फिरोज याचे नदीम आणि त्याच्या वडिलांसोबत भांडण झाले होते. काही लोकांनी मध्यस्थी केल्याने तडजोड झाली होती. मात्र, यानंतरही  फिरोज गटाने नदीम आणि त्यांच्या कुटुंबावर दागिने आणि रोख रक्कम चोरल्याचा आरोप करीत १० लाख रुपयांची मागणी केली. यातून त्यांच्यात पुन्हा वाद झाला होता. त्यानंतर आरोपींनी बुधवारी नदीमवर गोळी झाडून गंभीर जखमी केले आणि कारमधून पळवून नेले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादKidnappingअपहरण