शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

देवदर्शन करून येताना दुचाकीवरील नियंत्रण सुटले अन् तीन मित्रांनी प्राण गमावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 23:30 IST

एकाच चितेवर तिघांना दिला अग्निडाग; पिंप्री गावावर दुःखाचा डोंगर कोसळला 

- श्यामकुमार पुरेसिल्लोड: सैलानी बाबांच्या दर्शनासाठी गेलेल्या तिघा मित्रांचा एका वाहनाला ओव्हरटेक करताना नियंत्रण सुटल्याने दुचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी दुपारी २.३० वाजता चिखली ते जाफ्राबाद रोडवर झाला. 

अपघातात ठार झालेले तिघेही तरुण सिल्लोड तालुक्यातील पिंप्री येथील राहणारे आहेत. रोहित महादू चाबूकस्वार ( वय १८ वर्ष रा.पिंप्री  ता सिल्लोड ), शुभम रमेश चाबूकस्वार (वय १५ वर्ष रा.पिंप्री ), सोनू सुपडू उसरे (वय २१ वर्षे रा.नाशिक ) अशी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. एम एच १५, ०७५७ क्रमांकाच्या पल्सर वाहनाने तिघे तरुण कुंभारी येथे जात होते.काळाने त्यांचा घात केला.

नाशिक येथील सोनू उसरे हा पिप्री येथे नातेवाईकाकडे भेटायला आला होता.  चिखली जवळ सैलानीची यात्रा असल्याने सोनू हा गावातील राहुल आणि शुभम हे तिघे मोटार सायकलवर मंगळवारी सकाळी १०.३० वाजता पिप्री येथून निघाले होते. त्यांनी दुपारी सैलानी बाबांचे दर्शन केले व ते सोनू उसरे याचे पाहुणे असलेले भोकरवाडी जवळील कुंभारी येथे जात होते. दरम्यान, एका वाहनाला ओव्हरटेक करतांना समोरून दुसरे वाहन आल्याने नियंत्रण सुटून दुचाकी एका झाडावर जाऊन आदळली. यात तिघांचाही मृत्यू झाला. सोनू हा दुचाकी चालवत होता तर राहुल व शुभम त्याच्या मागे बसले होते. रोहित व शुभम हे चुलते पुतणे आहेत. एकाच कुटुंबातील दोघे व त्यांचा मित्र अपघातात ठार झाल्याने पिंप्री गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

एकाच चितेवर तिघांना अग्नीडाग अपघातात ठार झालेल्या शुभम, सोनू, आणि रोहित यांचे पार्थिव सिल्लोड तालुक्यातील पिंप्री येथे आणण्यात आले. मंगळवारी रात्री ९.३० वाजता गावातील स्मशानभूमीत एकाच चितेवर तिघांना अग्नीडाग देण्यात आला.

शुभमने १० वीची तर राहुलने १२ वीची दिली परीक्षाशुभमने एसएससी बोर्डाची दहावीची परीक्षा दिली आहे. त्याच्या परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वी त्याच्या आयुष्याचा निकाल लागला.त्याच्या मागे आई वडील एक बहीण असा परिवार आहे. तर राहुलने बारावीची परीक्षा दिली आहे.त्याचा ही परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वी अपघातात मृत्यू झाला.त्याच्या मागे आई , वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू