शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

तीन लाखांची चोरी; सराईत गुन्हेगार अटकेत

By admin | Updated: December 30, 2015 00:44 IST

वाळूज महानगर : तीन लाखांच्या चोरीप्रकरणी वाळूज पोलिसांनी मंगळवारी (दि.२९) एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरी केलेले ५०

वाळूज महानगर : तीन लाखांच्या चोरीप्रकरणी वाळूज पोलिसांनी मंगळवारी (दि.२९) एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरी केलेले ५० हजारांचे सोन्याचे ब्रेसलेट जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणातील दोघा अल्पवयीन आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे.श्रद्धा कॉलनी येथील संतोष वडाळे यांच्या घरी चोरी करून सव्वातीन लाख रुपयांचा ऐवज लांबविण्यात आला होता. गुप्त बातमीदाराने चोरट्यांविषयी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर कदम, फौजदार गजानन सोनटक्के, फौजदार संजय बनकर, फिरोज तडवी, शैलेंद्र अडियाल, कांबळे यांच्या पथकाने छापा मारून आरोपी नितीन राजपूत (२४, रा. अविनाश कॉलनी, वाळूज) यास शिताफीने अटक केली. राजपूतच्या ताब्यातून ५० हजार रुपयांचे सोन्याचे ब्रेसलेट जप्त करण्यात आले. यातील दोन अल्पवयीन आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, चौथ्या फरार आरोपींचा शोध सुरू आहे.संतोष वडाळे हे खाजगी कंपनीत वितरक असल्यामुळे त्यांच्याकडे मोठी रक्कम असल्याची माहिती आरोपी नितीन राजपूत व त्याच्या तिघा साथीदारांना समजली होती. २७ डिसेंबरला वडाळे हे कुटुंबियांसह बाहेरगावी गेल्यामुळे वडाळे यांच्यावर पाळत ठेवलेल्या आरोपींनी घराचे कुलूप तोडून कपाटीतील रोख अडीच लाख रुपये व ६५ हजार रुपयांचे दागिने लांबविले.या प्रकरणात अटक करण्यात आलेला नितीन राजपूत हा सराईत गुन्हेगार आहे. या टोळीकडून वाळूज व शहरातील अनेक चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी वर्तविली आहे.