महापालिका निवडणुकीसाठी तीन लाख ९६ हजार मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 12:44 AM2017-08-20T00:44:16+5:302017-08-20T00:44:16+5:30

महापालिकेच्या आॅक्टोबर २०१७ मध्ये होणाºया सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी १९ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. महापालिकेसाठी ३ लाख ९६ हजार ३९६ मतदार निश्चित करण्यात आल्या आहेत. महापालिकेने प्रभागनिहाय ही मतदारयादी प्रसिद्ध केली आहे.

Three lakh 96 thousand voters for the municipal election | महापालिका निवडणुकीसाठी तीन लाख ९६ हजार मतदार

महापालिका निवडणुकीसाठी तीन लाख ९६ हजार मतदार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: महापालिकेच्या आॅक्टोबर २०१७ मध्ये होणाºया सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी १९ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. महापालिकेसाठी ३ लाख ९६ हजार ३९६ मतदार निश्चित करण्यात आल्या आहेत. महापालिकेने प्रभागनिहाय ही मतदारयादी प्रसिद्ध केली आहे.
महापालिका निवडणुकीच्या प्रशासकीय तयारीत मतदार याद्यांचे काम वेगात सुरू होते. राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर शनिवार ही यादी प्रभागनिहाय प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा आयुक्त गणेश देशमुख, निवडणूक विभागाचे उपायुक्त संतोष कंदेवार यांनी दिली. शनिवारी या मतदार याद्या संकेतस्थळावरही टाकण्यात आल्या आहेत. महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारुप मतदार यादीनुसार महापालिकेच्या एकूण २० प्रभागापैकी सिडको या प्रभागात २९ हजार ३१५ असे सर्वाधिक मतदार राहणार आहेत. तर सर्वात कमी मतदार संख्या प्रभाग क्र. ११ हैदरबागमध्ये आहे. येथे १५ हजार ६३१ मतदार आहेत.
विधानसभा मतदार यादीतून महापालिकेने प्रभागनिहाय मतदार याद्या केल्या आहेत. त्यात पुरवणी याद्याही जोडण्यात आल्या आहेत. पुरवणी यादीची मतदार संख्या ३ हजार ३७२ इतकी आहे.
महापालिकेच्या प्रभाग १ तरोडा खुर्दमध्ये २० हजार ३९६, प्रभाग २ तरोडा बु. मध्ये २० हजार २७५, प्रभाग ३ सांगवीमध्ये १६ हजार ४००, प्रभाग ४ हनुमानगडमध्ये १८ हजार ८४७, प्रभाग ५ भाग्यनगरमध्ये १७ हजार ६८०, प्रभाग क्र. ६ गणेशनगरमध्ये १९ हजार ३९९, प्रभाग क्र. ७ श्रावस्तीनगरमध्ये १७ हजार ६४५, प्रभाग क्र. ८ शिवाजीनगरमध्ये २२ हजार ७४२, प्रभाग क्र. ९ हमालपूरामध्ये १९ हजार १३६, प्रभाग क्र. १० दत्तनगरमध्ये १६ हजार ९६९, प्रभाग क्र. ११ हैदरबागमध्ये १५ हजार ६३१, प्रभाग क्र. १२ उमरकॉलनीमध्ये १७ हजार ६७८, प्रभाग क्र. १३ चौफाळा/ मदिनानगर येथे १८ हजार ३९९, प्रभाग क्र. १४ होळी येथे २२ हजार ५५३, प्रभाग क्र. १५ इतवारा येथे १८ हजार ९१९, प्रभाग क्र. १६ गाडीपुरामध्ये १९ हजार ९५८, प्रभाग क्र. १७ गुरुद्वारा प्रभागात २३ हजार ५३७, प्रभाग क्र. १८ खडकपूरा/ देगावचाळमध्ये २१ हजार ७१८, प्रभाग क्र. १९ वसरणी कौठा येथे १९ हजार १९९ आणि प्रभाग क्र. २० सिडको प्रभागात सर्वाधिक २९ हजार ३१५ मतदार आहेत. तरोडा क्षेत्रिय कार्यालयात प्रभाग १, २, ३, शिवाजीनगर क्षेत्रिय कार्यालयात ४ ते १०, इतवारा क्षेत्रिय कार्यालयात ११ ते १८ आणि सिडको क्षेत्रिय कार्यालयात प्रभाग १९ व २० ची यादी उपलब्ध होणार आहे.

Web Title: Three lakh 96 thousand voters for the municipal election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.