शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात ‘थ्री इन वन’ बैलजोडी; अर्ध्या फुटाच्या बैलांनी वेधले लक्ष

By प्रशांत तेलवाडकर | Updated: September 14, 2023 16:26 IST

पोळ्यानिमित्त बाजारात आल्या अर्धा फूट इंचीच्या बैलजोड्या’. ज्याचा ‘थ्री इन वन’ असा वापर केला जाऊ शकतो.chh

छत्रपती संभाजीनगर : वर्षभर शेतामध्ये राबणाऱ्या ‘सर्जा-राजा’ या खिल्लारी जोडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे ‘पोळा’. गुरुवारी हा सण साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त घरोघरी माती किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बैलजोडीचे पूजन करण्यात येईल. यंदा नावीन्य म्हणजे चक्क अर्धा फूट उंचीची बैलजोडी बाजारात आली असून महाग असली तरी हौशी लोक खरेदी करीत आहेत. कारण, या जोड्या ‘थ्री इन वन’ आहेत.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ‘थ्री इन वन’ कसे काय? तर या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बैलजोड्या अर्धा फूट उंचीच्या आहेत. त्यांची पोळ्याच्या दिवशी पूजा करण्यात येईल व गणेशोत्सवात बैलगाडीच्या देखाव्यासाठी व नंतर वर्षभर ‘शो पीस’ म्हणून वापर केला जाऊ शकतो. यामुळे यास ‘थ्री इन वन’ असे म्हटले आहे.

बैलजोडीची किंमत किती ?प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या अर्धा फूट उंचीच्या बैलजोडीची किंमत अडीच हजार ते चार हजार रुपये दरम्यान सांगितली जात आहे. त्यावर जसजशी सजावट केली जाते, तसतशी त्याची किंमतही वाढते, असे मूर्तिकार जवळेकर यांनी सांगितले.

हौशींकडून खरेदीया अडीच हजार ते चार हजार रुपये किमतीच्या ‘सर्जा-राजा’ची बैलजोडी मूर्तिकारांनी तयार केली. पण या विक्री होतील की नाही, अशी पाल त्यांच्या मनात चुकचुकत होती. मात्र हौशी ग्राहकांनी या बैलजोड्या किमतीत घासाघीस न करता खरेदी केल्या. यामुळे पुढील वर्षी १ फूट उंचीच्या बैलजोड्या तयार करण्यात येईल, असेही मूर्तिकारांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी