शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव महामार्गावरील चौका घाटात तीन तास वाहतूक ठप्प; प्रवाशांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 20:14 IST

फुलंब्री-औरंगाबाद या राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंटीकरणचे काम पाच वर्षांपासून सुरू आहे.

फुलंब्री ( औरंगाबाद) : जळगाव राष्ट्रीय महामार्गावर चौकाघाटामध्ये  दोन दिवसांपासून एक ट्रक नादुरुस्त अवस्थेत रस्त्यावर उभा आहे. तर आज  एक एसटी बस अचानक बंद पडल्याने मार्गावरील वाहतूक व्यवस्था तीन तास ठप्प झाली. दोन्ही बाजूंनी चार ते पाच किमी लांबपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

फुलंब्री-औरंगाबाद या राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंटीकरणचे काम पाच वर्षांपासून सुरू आहे. अनेक ठिकाणी पुलाचे काम होणे बाकी आहे. या राखादेलेल्या महत्वाच्या मार्गाकडे राजकीय नेत्यांसह संबंधित अधिकाऱ्याचे दुर्लक्ष झाले आहे. दरम्यान, चौका घाटात गेल्या दोन दिवसांपासून एक ट्रक ( एमपी १२ एच ०४४९) नादुरुस्त अवस्थेत रस्त्याच्या मध्यभागी उभा होता. त्यात गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान एक एसटी बस अचानक बंद पडली. परिणामी दोन्ही बाजूने रस्ता बंद झाला. यामुळे सकाळी १० वाजेपासून तर दुपारी  १  वाजेपर्यंत या मार्गावर वाहतक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूने चार ते पाच किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यानंतर वाहतूक पोलीस आले. वाहतून सुरळीत करण्यात पोलिसांना चांगलीच मेहनत घ्यावी लागली. 

महत्वाच्या मार्गाकडे होतेय दुर्लक्ष औरंगाबाद -जळगाव हा राष्ट्रीय महामार्ग आहे या मार्गावर दररोज हजारो वाहने ये-जा करतात. एकतर रस्त्याची अनेक ठिकाणी कामे सुरु असताना नादुरुस्त वाहने रस्त्यावरच उभी आहेत. त्या वाहनांना तात्काळ बाजूस करणे आवश्यक होते. स्थानिक पोलीस, महामार्ग पोलीसांनी याकडे लवकर लक्ष दिले असते तर वाहतूक ठप्प होऊन प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला नसता. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघात