शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमध्ये पहिल्यांदाच सलग तीन दिवस झेंडावंदन; १३ ते १५ ऑगस्टपर्यंत दररोज तिरंगा झळकणार

By राम शिनगारे | Updated: August 12, 2023 19:30 IST

केंद्र शासनाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत 'हर घर तिरंगा' हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाने सर्व प्रकारच्या शाळांमध्ये १३ ते १५ ऑगस्टदरम्यान दररोज शाळांमध्ये झेंडावंदन करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शनिवारी सकाळी एक आदेश काढला. त्यानंतर सायंकाळी तीन दिवस झेंडावंदन करण्याचा आदेश काढला आहे. त्यामुळे दिवसभर शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण दिसून आले.

केंद्र शासनाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत 'हर घर तिरंगा' हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सुचना १० ऑगस्ट रोजी प्राप्त झाल्या. त्यानुसार ११ ऑगस्ट रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्यभरातील सर्व शिक्षणाधिऱ्यांना आदेश काढला. या आदेशानुसार १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी अस्थापना, सहकारी संस्थांच्या कार्यलयावर तिरंगा फडकाविण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी शनिवारी (दि.१२) सकाळी आदेश काढीत १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान 'हर घर तिरंगा' उपक्रम राबवावा. तिनही दिवस ध्वजारोहण करण्याची गरज नाही. केवळ १५ ऑगस्ट रोजीच शाळांनी ध्वजारोहण करावे असे स्पष्ट केले. सकाळी १२ वाजेच्या सुमारास निघालेला हा आदेश सायंकाळी ६ वाजता बदलण्यात आला. नव्या आदेशानुसार १३ ते १५ या कालावधीत सर्व प्रकारच्या शाळांमध्ये ध्वजारोहण करण्याचे स्पष्ट करण्यात आले. या प्रकारामुळे शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक गोंधळून गेले होते. दररोज ध्वजारोहण करायचे असेल तर त्याविषयीची नियमावलीही पाळावी लागणार आहे. जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकारी सुधारित आदेश वरिष्ठांच्या सूचनेनुसार काढल्याची माहिती शिक्षण विभागातुन देण्यात आली.

विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये 'हर घर तिरंगा'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या संचालकांनी काढलेल्या आदेशानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व विद्यापीठांना पत्र पाठवले आहे. त्यानुसार आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत 'हर घर तिरंगा' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालय, विभागांमधील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी १३ ते १५ या कालावधीत 'हर घर तिरंगा' उपक्रम राबवावा. राबविलेल्या उपक्रमांचे छायाचित्र संकेतस्थळासह सोशल मिडियावर टाकावे अशा सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादIndependence Dayस्वातंत्र्य दिनEducationशिक्षण