शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरातील नवनिर्वाचित नगरसेवकांची ‘विकेट’ घेण्यासाठी विरोधक सरसावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 17:30 IST

विरोधकांची कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली असून, काही तक्रारी मनपा आयुक्तांकडे तर काही प्रकरणे खंडपीठात दाखल होतील.

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीचा निकाल लागून ११ दिवसच झालेले असताना काही नगरसेवकांना तीन अपत्ये असल्याचे तर कोणी निवडणूक शपथपत्र खोटे दिले, मनपाच्या जागेवर अतिक्रमण, जात प्रमाणपत्र खोटे दिले, असे विविध प्रकार उघडकीस येत आहेत. काही नवनिर्वाचित नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी विरोधक सरसावल्याचे चित्र आहे. विरोधकांची कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली असून, काही तक्रारी मनपा आयुक्तांकडे तर काही प्रकरणे खंडपीठात दाखल होतील. त्यामुळे पुढील काही दिवसांत तीन ते चार प्रभागात पोटनिवडणूक लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

काही राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना कोणतीही चौकशी, शहानिशा केली नाही. आता ते उमेदवार निवडून आले आहेत. मुस्लिमबहुल भागातील काही प्रभागांमधून निवडून आलेल्या नगरसेवकांना तीन ते चार अपत्य असल्याचे उघडकीस येत आहे. अपत्यांच्या जन्म प्रमाणपत्रांचे दाखले मिळविण्यास विरोधकांनी सुरुवात केली. अपत्याची तक्रार मनपा आयुक्तांकडे करता येते. त्याचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे जातो. त्याचप्रमाणे एका महिला उमेदवाराच्या मुलाने मनपाच्या जागेवर अतिक्रमण केले आहे. नियमानुसार या नगरसेविकेचे पद रद्द होऊ शकते. एका उमेदवाराने खोटे शपथपत्र सादर केले. ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या एका महिलेचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचे विरोधकांचे आरोप आहेत. हा वादही खंडपीठात जाऊ शकतो. आगामी काळात काही नवनिर्वाचितांची विकेट पडणार, हे जवळपास निश्चित आहे. तेथे पोटनिवडणूक घ्यावी लागेल. २०१५ मध्ये काही वाॅर्डात पोटनिवडणूक घ्यावी लागली होती.

बहुमताजवळ; पण गुलमंडी गेली...भाजपचे ५७ सदस्य निवडून आले. बहुमताजवळ पक्ष गेला. पण शहराचे हृदयस्थान असलेला गुलमंडी प्रभाग हातातून गेल्याचे जास्त दु:ख भाजपला आहे. या प्रभागात पोटनिवडणूक लागली तर हे दु:ख दूर करून बहुमताचा आकडा पार करता येईल का, या दृष्टीनेही भाजपने तयारी सुरू केली आहे.

उमेदवार एक प्रमाणपत्र दुसऱ्यालानिवडून आलेल्या सदस्याच्या हातीच निवडणूक निर्णय अधिकारी प्रमाणपत्र देतात. काही प्रभागात उमेदवाराच्या मुलाने, जावयाने, पतीने, सासऱ्याने प्रमाणपत्र घेतल्याचे उघडकीस आले. एक नगरसेविका तर अंथरुणाला खिळलेली असल्याची चर्चा आता मनपात आहे.

तक्रारींची शहानिशानिवडणूक विभागाकडे दोन तक्रारी आल्या आहेत. शहानिशा करून वरिष्ठांना अहवाल पाठविला जाईल. त्यावरून वरिष्ठ निर्णय घेतील.- विकास नवाळे, उपायुक्त, निवडणूक विभाग

English
हिंदी सारांश
Web Title : Newly Elected Corporators Face Challenges: False Affidavits and More

Web Summary : Newly elected corporators in Chhatrapati Sambhajinagar face allegations of false affidavits, encroachments, and questionable caste certificates. Opponents are gathering evidence, potentially leading to by-elections in several wards. Some candidates allegedly have three children. BJP eyes Gulmandi by-election to gain majority.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMunicipal Corporationनगर पालिका