शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ब्रॅण्डेड कपडे आणि नशेसाठी दुकाने फोडणारी तीन मुले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 16:07 IST

बालसुधारगृहातून बाहेर आल्यानंतर पुन्हा चोऱ्या करण्यास सुरुवात

ठळक मुद्देतीन दुकानांचे शटर उचकटून ४१ हजार रुपये रोख आणि मोबाईल चोरला गांजा ओढण्याचे व्यसन आणि महागडे कपडे घालण्यासाठी चोरी केल्याचे उघड

औरंगाबाद : ब्रॅण्डेड कपडे, बूट आणि गॉगल, तसेच नशा करण्यासाठी दुकानांचे शटर उचकटून चोऱ्या करणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना (विधिसंघर्षग्रस्त बालक) पुंडलिकनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. या मुलांनी पुंडलिकनगर, मुकुंदवाडी, गारखेडा, खुलताबाद आदी ठिकाणी दुकानांचे शटर उचकटून चोऱ्या केल्याची कबुली दिली. 

याविषयी अधिक  माहिती देताना पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले की, १४ मे रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास कामगार चौकातील सुरेश पंडितराव कचकुरे यांच्या मालकीचे साईबाबा डेली नीडस् आणि विष्णू भगवान सोनवणे यांच्या मालकीचे टेस्टी राईट, तसेच चंद्रकांत सुधाकर चव्हाण यांचे भक्ती कलेक्शन या तीन दुकानांचे शटर उचकटून चोरट्यांनी ४१ हजार रुपये रोख आणि मोबाईल चोरून नेला होता.

याप्रकरणी कचकुरे यांच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात १५ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा नोंद होताच, पोलिसांनी तपास करून बारा तासांत तीन विधिसंघर्षग्रस्त बालकांना संशयावरून ताब्यात घेतले. त्यावेळी तिन्ही मुलांच्या अंगावर ब्रॅण्डेड कपडे, गॉगल आणि बूट, चप्पल आदी आढळून आले. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता एका मुलाजवळ मोबाईल हॅण्डसेट मिळाला. अधिक चौकशीअंती तो मोबाईल एक दिवसापूर्वी एका दुकानातू चोरल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या अंगावरील उच्च दर्जाचे कपडेही चोरीच्या पैशातून खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले.

गांजा ओढण्याचे व्यसन त्यांना जडले असून, गांजाचे व्यसन भागविण्यासाठी आणि चांगले कपडे, बूट खरेदी करण्यासाठी कामगार चौक, पुंडलिकनगर, जवाहरनगर आदी परिसरातील दुकानांचे शटर उचकटून चोऱ्या केल्याचे त्यांनी सांगितले. बारा तासांत आरोपींना अटक करण्याची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. सोनवणे, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, कर्मचारी रमेश सांगळे, मच्छिंद्र शेळके, बाळाराम चौरे, लक्ष्मण हिंगे, विठ्ठल फरताळे, विलास डोईफोडे, जालिंदर मांटे, रवी जाधव, शिवाजी गायकवाड, राजेश यदमळ यांनी एसपीओ बुट्टे, विटेकर आणि बोधक यांच्या मदतीने केली. 

कुख्यात गुन्हेगार उमप चालवितो गँगपोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार दादाराव उमप हा अल्पवयीन मुलांची गँग चालवीत असल्याचे समोर आले. लहान मुलांकडून तो चोऱ्या करून घेतो. पोलिसांनी पकडलेली तिन्ही मुले झोपडपट्टीतील रहिवासी आहेत, विशेष म्हणजे गतवर्षी जानेवारी महिन्यात उपनिरीक्षक योगेश धोंडे यांच्या पथकाने या मुलांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली होती. सुधारगृहातून बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा चोऱ्या करण्यास सुरुवात केल्याचे समोर आले.

टॅग्स :ArrestअटकtheftचोरीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस