शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेकडे शरीरसुखाची मागणी, तरुणावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 16:38 IST

विवाहिता शेतात असताना गावातील युवकाने लपून केला व्हिडीओ शूट

सिल्लोड (औरंगाबाद) : एका युवकाने गावातीलच एका २७ वर्षीय विवाहीतेचा शेतातील आणि बाथरूममधील आक्षेपार्ह फोटो काढले, व्हिडीओ शूट केला. त्यानंतर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत विवाहीतेकडे शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील आसडी येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर काळू शहा (रा. आसडी ता.सिल्लोड ) असे आरोपीचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, समीर शहा याने गावातील एका विवाहितेचे तिच्या नकळत आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ घेतले. त्यानंतर पंधरा दिवसांपूर्वी पिडीता तिच्या घरासमोर असताना समीरने मोबाईलमधील आक्षेपार्ह फोटो दाखवत विवाहितेला धमकावले. तसेच माझ्यासोबत संबंध ठेव अन्यथा तुझा न्यूड व्हिडीओ, फोटो सोशल मीडियात व्हायरल करेल अशी धमकी दिली.

वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून पिडीतेने सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांनी कलम 354(अ),354(क),354(ड),506 भादवी सह कलम 3(1)(w)(i)(ii),3(2)(va)अजाजका,कलम प्रमाणे गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव हे करत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी