शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट

By सुमित डोळे | Updated: April 22, 2025 14:13 IST

धमकीचा ईमेल प्राप्त होताच, हायकोर्ट प्रशासनाने त्वरित पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह बॉम्बशोधक व नाशक पथक दाखल

छत्रपती संभाजीनगर : येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाला ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आज दुपारी सुमारे १२ वाजेच्या दरम्यान ही धमकीची माहिती समोर आली असून, तात्काळ सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.

धमकीचा ईमेल प्राप्त होताच, हायकोर्ट प्रशासनाने त्वरित पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहाय्यक आयुक्त डॉ. रणजीत पाटील, निरीक्षक कृष्णा शिंदे, हायकोर्ट सुरक्षाधिकारी कुंदन जाधव, सायबर पोलीस ठाण्याचे शिवचरण पांढरे तसेच बॉम्बशोधक व नाशक पथकाचे चार पथके, एटीएसचे पथक खंडपीठात दाखल झाले. सध्या संपूर्ण परिसरात तपासणी सुरू असून, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही. सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत आणि प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

हायकोर्टाचे कामकाज सुरळीतदरम्यान, धमकी असूनही हायकोर्टातील कामकाज नियमित सुरू ठेवण्यात आले आहे. ज्या व्यक्तींना न्यायालयात उपस्थित राहायचे आहे, त्यांना आत जाण्याची मुभा देण्यात आली आहे. कोणताही गोंधळ न होता पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी आपले काम शांतपणे आणि दक्षतेने पार पाडत आहेत. संपूर्ण घटनेची सायबर पोलिसांकडूनही कसून चौकशी सुरू असून, धमकी कुठून आली याचा तपास केला जात आहे.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAnti Terrorist Squadएटीएस