शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोड कामगारांची हजारो मुले हंगामी वसतिगृहाच्या प्रतीक्षेत, शिक्षणात खंड पडण्याची शक्यता

By विजय सरवदे | Updated: November 15, 2022 19:12 IST

आता दिवाळीच्या सुटीनंतर शाळांचे दुसरे सत्र सुरू झाले. मात्र, पाहिजे तेवढी हंगामी वसतिगृहे सुरू झालेली नाहीत.

औरंगाबाद :शिक्षणात खंड पडू नये म्हणून ऊसतोड कामगारांसोबत त्यांच्या मुलांना न पाठविता त्यांच्यासाठी दरवर्षी नोव्हेंबरच्या सुरुवातीला जि.प. शिक्षण विभागामार्फत हंगामी वसतिगृहे सुरू केली जातात. परंतु, यंदा आतापर्यंत अवघी तीन हंगामी वसतिगृहे सुरू झाली आहेत. दरवर्षी साधारणपणे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यापासून जिल्ह्यातून ऊसतोड कामगार प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात तसेच परराज्यांत स्थलांतरित होतात. हे कामगार आपल्या मुलांनाही सोबत घेऊन जात असल्यामुळे या मुलांचे शिक्षण अर्ध्यावरच खंडित होते. ते टाळण्यासाठी जि. प. शिक्षण विभागाने मागील तीन- चार वर्षांपासून हंगामी वसतिगृहाचा उपक्रम हाती घेतला. यंदा शिक्षण विभागाने १४ ऑक्टोबरला किती मुलं अर्ध्यावर शाळा सोडून आपल्या पालकांसोबत ऊसतोडीसाठी जाणार आहेत, त्याचे सर्वेक्षण केले होते. तेव्हा जवळपास साडेतीन हजार स्थलांतरित मुलांची संख्या समोर आली. यातील बहुतांशी मुलं दिवाळीपूर्वीच येथून स्थलांतरित झाली होती.

तथापि, आता दिवाळीच्या सुटीनंतर शाळांचे दुसरे सत्र सुरू झाले. मात्र, पाहिजे तेवढी हंगामी वसतिगृहे सुरू झालेली नाहीत. कन्नड आणि पैठण या दोन तालुक्यांत तीन वसतिगृहे सुरू झाली आहेत. यामध्ये कन्नड तालुक्यातील अंबाला येथील वसतिगृहाद्वारे १९३, पैठण तालुक्यातील गेवराई बासी येथे ७४ आणि अब्दुलापूर तांडा येथे १०० विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

शिक्षण हमी कार्ड देणारयासंदर्भात जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा यांनी सांगितले की, २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान सर्वेक्षण मोहिम राबविली जाणार आहे. या मोहिमेद्वारे जिल्हा बाहेर स्थलांतरित विद्यार्थी तसेच इतर जिल्ह्यांतून या जिल्ह्यात येणारे स्थलांतरित विद्यार्थ्यांचा शोध घेतला जाणार आहे. स्थलांतरित होणारे विद्यार्थी राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात गेले तरी तेथे त्यांचे शिक्षण सुरू राहावे, यासाठी त्या मुलांना शिक्षण हमी कार्ड दिले जाणार आहे.

स्थलांतरित विद्यार्थ्यांना परत आणणारयासंदर्भात शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी सांगितले की, प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान स्थलांतरित होणाऱ्या मुलांचा शोध घेणार आहोत. स्थलांतरित झालेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्याचा प्रयत्नदेखील करणार आहोत. सध्या तीन हंगामी वसतिगृहांना परवानगी दिली आहे. काही गावांत शालेय व्यवस्थापन समित्यांमार्फत मुलांना सांभाळण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSugar factoryसाखर कारखानेEducationशिक्षण