शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

सतीश चव्हाणांनी मोर्चेबांधणी केली, तरी यावेळी निवडणूक रंगणार हे अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 17:00 IST

१९५३ पासून ते १९७८ पर्यंत हा मतदारसंघ पुणे-खान्देश-मराठवाडा असा संयुक्त होता आणि ७८ पर्यंत त्यावेळच्या जनसंघाचे उत्तमराव पाटील प्रतिनिधित्व करत होते.

ठळक मुद्देमराठवाडा पदवीधरांचा आट्यापाट्याचा खेळसतीश चव्हाण गेल्या १२ वर्षांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.गेल्या दोन निवडणुकींतील पराभवाचा वचपा काढण्याची तयारी भाजपने केली

- सुधीर महाजन 

मोदी लाटेतही २०१४ मध्ये  मराठवाडा पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण निवडून आले हा तर एका अर्थाने भाजपला धक्काच होता; परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर गोपीनाथ मुंडेंचे निधन झाल्याचा फटकाही भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकरांच्या पराभवाचे एक कारण होते. १९५३ ते २०२० अशा ६७ वर्षांच्या इतिहासात बहुतेक काळ या मतदारसंघावर भाजपचे प्रभुत्व राहिले. आता गेल्या दोन निवडणुकींतील पराभवाचा वचपा काढण्याची तयारी भाजपने केली; पण आज निवडणुका जाहीर होईपर्यंत उमेदवाराची अधिकृत घोषणा नाही आणि रोज नवीन एक नाव पुढे येत आहे. सतीश चव्हाणांनी मोर्चेबांधणी केली, तरी यावेळी निवडणूक रंगणार हे अटळ आहे. 

१९५३ पासून ते १९७८ पर्यंत हा मतदारसंघ पुणे-खान्देश-मराठवाडा असा संयुक्त होता आणि ७८ पर्यंत त्यावेळच्या जनसंघाचे उत्तमराव पाटील प्रतिनिधित्व करत होते. ७८ साली सर्व मतदारसंघांची पुनर्रचना झाली. त्यात विधान परिषदेचाही समावेश असल्याने मराठवाड्याला स्वतंत्र मतदारसंघ मिळाला आणि भाजपच्या कुमुदताई रांगणेकर या निवडून आल्या. आजच्या घडीला या मतदारसंघात ३ लाख ५२ हजार मतदार असून, १२ नोव्हेंबरपर्यंत नोंदणी चालणार आहे. शक्तिस्थळांचा विचार केला तर सतीश चव्हाण गेल्या १२ वर्षांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठवाड्यातील प्रमुख नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. शिवाय मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ या मराठवाड्यातील आघाडीच्या शिक्षण संस्थेचे ते सरचिटणीस आहेत. ही शिक्षण संस्था महत्त्वाची यासाठी की, येथील सर्व पदाधिकारी आणि संचालक हे मराठवाड्याच्या राजकारणातील प्रभावी समजले जातात. हे संचालक एकजुटीने चव्हाणांच्या मागे उभे राहिले तर ती त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकते. गेल्या बारा वर्षांत चव्हाणांनी शिक्षक, प्राध्यापकांचे एक जाळे विणले आणि आपल्या समर्थकांचा एक गट उभा केला. 

भाजपच्या दृष्टीने मतदारांच्या विचारांमध्ये गेल्या दहा वर्षांत झालेला बदल आणि वाढलेले भाजपचे समर्थन ही जमेची बाजू समजता येईल. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ताब्यात जेवढ्या शिक्षण संस्था आहेत. त्यांची बरोबरी भाजपला करता येणार नाही; पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघामार्फत कार्यरत असणारी प्रचार यंत्रणा प्रभावी आहे. याशिवाय मराठवाड्यात भाजपच्या लोकप्रतिनिधींची संख्याही वाढली आहे. गेल्या काही वर्षांत मराठवाड्यातील पदवीधरांचे तसेच शिक्षक आणि प्राध्यापकांचे प्रश्न अतिशय तीव्र बनले असले, तरी त्यावर तोडगा निघाला नाही. शाळांचे अनुदान, कंत्राटी शिक्षक, तासिका तत्त्वावरील प्राध्यापक हे प्रश्न गंभीर आहेत. हॉटेलमध्ये काम करणारे तासिका तत्त्वावरील विनावेतनावर काम करणारे शिक्षक, मराठवाड्यात तयार झालेली बेरोजगारांची फौज असे ज्वलंत प्रश्न आज यावेळी उभे राहिले आणि मतदारही जागरूक बनला आहे. 

मराठवाडा पदवीधर निवडणूक दृष्टिक्षेपउमेदवार        पक्ष         वर्ष उत्तमराव पाटील     जनसंघ—     १९५३ ते ७८ कुमुद रांगणेकर    जनसंघ-     १९७८ वसंतराव काळे     काँग्रेस एस -     १९८४ सुरेश हिरे     (पराभूत, भाजप)जयसिंग गायकवाड    भाजप    १९९० वसंतराव काळे     (पराभूत, काँग्रेस)जयसिंग गायकवाड    भाजप    १९९६ वसंतराव काळे     (पराभूत, काँग्रेस) वसंतराव काळे     (पोटनिवडणूक) काँग्रेस     १९९८ संजय निंबाळकर     (पराभूत, भाजप)श्रीकांत जोशी    भाजप     २००२ वसंतराव काळे     (पराभूत, काँग्रेस)सतीश चव्हाण     राष्ट्रवादी     २००८ श्रीकांत जोशी     (पराभूत, भाजप)सतीष चव्हाण     राष्ट्रवादी     २०१४ शिरीष बोराळकर     (पराभूत, भाजप). 

टॅग्स :Satish Chavanसतीश चव्हाणMarathwadaमराठवाडाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाElectionनिवडणूक