शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

साठी ओलांडलेल्या त्या ‘तरुणांचा’ सायकल प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 16:31 IST

व्यायामाच्या अभावामुळे गुडघेदुखी, हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब या व्याधी आजकाल वयाची अगदी तिशी ओलांडताच जडत आहेत.

औरंगाबाद : व्यायामाच्या अभावामुळे गुडघेदुखी, हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब या व्याधी आजकाल वयाची अगदी तिशी ओलांडताच जडत आहेत. या आजारांमुळे पन्नाशीनंतर अनेकांना बस किंवा कारने प्रवास करणेही जिवावर येते. अशा परिस्थितीत वयाची साठी ओलांडलेले काही तरुण (!) पुणे ते लोणार असा प्रवास चक्क सायकलवर करीत असून, त्यांचा हा प्रवास प्रत्येकालाच अचंबित करणारा ठरत आहे.

गाड्यांचा सुळसुळाट झालेला असताना सायकल जणू अडगळीतच पडल्यासारखी झाली आहे. एखादा किलोमीटर सायकल चालविल्यामुळे धाप लागणारे अनेक तरुण पाहायला मिळतात. अशा सर्वांसाठीच पुण्याहून सायकलिंग करीत निघालेल्या या सर्व ज्येष्ठांचा प्रवास प्रेरणादायी आहे.दि.१८ रोजी पुणे येथून तेरा जणांनी हा सायकल प्रवास सुरू केला. यापैकी दोन जण वगळता उर्वरित सगळी मंडळी ६० वर्षांपेक्षा जास्त वयाची आहेत. ग्रुपमधील सर्वात ज्येष्ठ सदस्य दत्तात्रय मेहेंदळे ७७ वर्षांचे आहेत. मंगळवारी त्यांनी पुणे ते नगर हा टप्पा पार केला. दि. १९ रोजी ते नगरहून औरंगाबादला पोहोचले. दि.२० रोजी त्यांनी औरंगाबाद ते लोणार असा मार्ग पूर्ण केला. 

या प्रवासाविषयी संजय कट्टी म्हणाले की, आजच्या धकाधकीच्या जीवनात बैठे काम वाढल्यामुळे शरीराला व्यायाम, मेहनतीची सवय राहिलेली नाही. आम्ही सर्व जण आमच्या आनंदासाठी हा प्रवास करीत असून, सायकलिंगचे महत्त्व कृतीतून दाखवित आहोत. अविनाश मेढेकर, पद्माकर आगाशे, अनिल पिंपळीकर, डॉ. सुभाष कोकणे, दत्तात्रय गोखले, केशव जहागीरदार, दत्तात्रय मेहेंदळे, अरविंद चितळे, तान्हाजी सावंत, भारत केतकर, संजय कट्टी, प्रदीप भवलकर, विनायक मेढेकर यांचा या ग्रुपमध्ये सहभाग आहे. 

लवकरच करणार पुणे ते कच्छ प्रवास...अविनाश मेढेकर आणि दत्तात्रय गोखले यांनी दहा वर्षांपूर्वी आवड म्हणून पुण्यात सायकलिंग सुरू केले. त्यानंतर एके क जण यामध्ये जोडले गेले. आज त्यांच्या या ग्रुपमध्ये ६० ते ७० जणांचा सहभाग असून, आजवर त्यांनी पुणे- कन्याकुमारी, कोल्हापूर- मंगलोर, पुणे- गोवा असा प्रवास सायकलवर केला आहे. लवकरच पुणे- कच्छ असा प्रवास करण्याचाही त्यांना मानस आहे. ही मंडळी दररोज सकाळी २५ ते ३० किमी सायकलिंग करतात. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPuneपुणेLonarलोणार