शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ज्यांनी नोकरी दिली, त्यांनाच गंडवले; दोन कंपन्यांमध्ये २१ लाखांचा घोटाळा उघड, दोघांवर गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 13:13 IST

क्रांती चौक ठाण्यात अनुक्रमे ९ व १२ लाखांच्या घोटाळ्याचे दोन गुन्हे दाखल

छत्रपती संभाजीनगर : ज्यांनी नोकरी दिली, त्यांनाच लाखोंचा गंडा घालत दोन कंपन्यांच्या दोन कर्मचाऱ्यांनी पोबारा केला. यात क्रांती चौक पोलिस ठाण्यात सतीश त्र्यंबक त्रिभुवन (रा. भीमशक्ती नगर) व राजेश कांतीलाल जैन (५५, रा. श्रेयनगर) यांच्यावर या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले.

जैन हे सत्यम् पॉलिमेट्स प्रा. लि. या कंपनीत डिसेंबर, २०२२ पासून सेल्स विभागात कामाला होते. ग्राहकांकडून ऑर्डर घेणे, त्यांची थकबाकी गोळा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. जैन यांनी कंपनीत रुजू होताच ग्राहकांच्या थकबाकीची रक्कम स्वत:च लंपास करणे सुरू केले. जवळपास वर्षभरात त्यांनी कंपनीचे १२ लाख ७४ हजार रुपये लंपास केले. घोटाळा उघडकीस आल्यावर जैनने कंपनीला व्याजासह परत करण्याचे आश्वासन देऊन संपर्कच बंद केला. अखेर, कंपनीचे व्यवस्थापक नकुल चांडक यांनी पोलिस आयुक्तालयात तक्रार केली. त्यावरून जैनवर गुन्हा दाखल करण्यात आला.

त्रिभुवनने ९.७१ लाख लंपास केलेसतीश त्रिभुवन हा जीवनदीप एड्यूमीडिया कंपनीत सेल्स विभागात कामाला होता. ही कंपनी शैक्षणिक पुस्तके, नोटबुक, ऑडिओ व्हिडिओ शैक्षणिक साहित्य विक्री करते. त्रिभुवनकडे शहरासह पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, वाळुज, रांजणगावमधील शाळांची जबाबदारी हाेती. त्यात केवळ धनादेशाद्वारेच बिलाची रक्कम स्वीकारण्याचे आदेश होते. सप्टेंबर, २०२१ मध्ये कंपनीने थकबाकी असलेल्या शाळांना संपर्क केला. तेव्हा त्रिभुवनने त्यांच्याकडून ती वसूल करून स्वत:च्याच बँक खात्यावर घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यानेही कंपनीला पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. मात्र, ते परत न करताच पोबारा केला.

टॅग्स :fraudधोकेबाजीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी