शहरं
Join us  
Trending Stories
1
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
2
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
3
“पोलीस आयुक्तांना नेहमी फोन करतो”; पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अजित पवार स्पष्टच बोलले
4
Rules Changed From 1st June 2024: १ जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्ससह बदलले 'हे' नियम, SBI च्या ग्राहकांसाठीही मोठी अपडेट
5
इंडिगोच्या विमानात पुन्हा बॉम्बची धमकी; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
6
Tarot card: कोणतेही कारण असो, थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय; ही शिकवण देणारा आठवडा!
7
मुलाला, बापाला अन् बापाच्या बापालाही अटक करण्यात आलीय, जे दोषी असतील...; अजित दादा स्पष्टच बोलले
8
Apara Ekadashi 2024: अपरा एकादशीला सूर्याची उपासना करा; अकाली मृत्यूची भीती घालवा; वाचा शास्त्र!
9
'लगान' नाही तर 'या' सिनेमाच्या सेटवर सुरू झाली होती किरण राव आणि आमिर खानची लव्हस्टोरी
10
“काँग्रेसचा दारुण पराभव होणार असल्यानेच एक्झिट पोल चर्चांमध्ये सहभागी होणार नाही”: अमित शाह
11
पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळी बॉम्बफेक; सीपीएम, आयएसएफचे कार्यकर्ते जखमी, ईव्हीएमही पाण्यात फेकले  
12
“PM मोदींची ध्यानसाधना देशाला लाभदायक, दुराचारी लोकांना त्याचे महत्त्व नाही”: योगी आदित्यनाथ
13
अजित पवारांची सभा घेतली, राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल
14
अग्रलेख: डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अडचणीत! लाच दिल्याप्रकरणी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी
15
मतदानाच्या सप्तपदीतील शेवटची फेरी आज; ८ राज्यांत ५७ जागांवर दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
16
विशेष लेख: धूर्त सत्ताधीश, निवडणुका आणि ‘एआय’.... विज्ञान : शाप की वरदान?
17
सलमान खानच्या हत्येचा नवा कट उघडकीस, पाकिस्तानमधून मागवणार होते शस्त्रं
18
अन्वयार्थ लेख: सध्या तरुणांचा असलेला भारत देश २०५० मध्ये ‘वृद्ध’ होईल, तेव्हा काय करणार?
19
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! DA नंतर आता ग्रॅच्युइटीत केली वाढ, पाहा डिटेल्स 
20
LPG Price Cut: महिन्याच्या सुरुवातीलाच खूशखबर, स्वस्त झाला LPG Cylinder; पाहा नवे दर

यंदा प्रचारात रील्स, व्हिडीओ, ग्राफिक्सचा बोलबाला; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा वाढला भाव

By संतोष हिरेमठ | Published: April 10, 2024 6:02 PM

राजकीय पक्षांच्या डिजिटल शाखांकडून जोरात तयारी : रील्स, व्हिडीओ, फोटोच्या माध्यमांतून तरुण मतदारांना करणार आकर्षित

छत्रपती संभाजीनगर : सध्याची तरुणाई सोशल मीडियावर रील्स, व्हिडीओ, फोटो अपलोड आणि लाइक, कमेंट, शेअर करण्यात व्यस्त असते. त्यामुळे लोकसभेचा प्रचार गल्लोगल्लीसह सोशल मीडियावरही रंगणार आहे. हटके रील्स, व्हिडीओ, फोटोच्या माध्यमांतून तरुण मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यंदा प्रचारात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर भाव खाणार, असे दिसते.

सध्या प्रत्येकाच्या हातात मोबाइल असतो आणि मिनिटा-मिनिटाला व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स यांसारख्या सामाजिक माध्यमांवर कोणी काय पोस्ट केली, हे पाहण्यात प्रत्येकजण व्यस्त असतो. त्यामुळेच राजकीय पक्षांनी सोशल मीडिया सांभाळणारी स्वतंत्र यंत्रणा आणि डिजिटल शाखा तयार केलेली आहे. सोशल मीडियावर प्रचार करण्यासाठी खास रणनीतीही आखली जात आहे. गेल्या काही काळात विविध गोष्टींचा प्रचार करण्यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा आधार घेतला जात आहे. कारण या इन्फ्लुएन्सरचे हजारो फाॅलोअर्स असतात. त्यांच्या एका पोस्टच्या माध्यमातून एकाच वेळी हजारोंपर्यंत एखादी गोष्ट पोहोचते. हीच बाब ओळखून यंदा प्रचारात इन्फ्लुएन्सरच्या माध्यमातून उमेदवाराची, पक्षाची माहिती कशाप्रकारे पोहोचवता येईल, याची रणनीती विविध पक्षांकडून आखली जात आहे. त्याबरोबर राजकीय पक्षांतील डिजिटल शाखांतील पदाधिकारीही रील्स, पोस्ट, फोटोतून सोशल मीडियावरून मतदारांना आकर्षित करण्यास सुरुवात केल्याचेही पाहायला मिळत आहे.

२०१९च्या तुलनेत आता वाढला इंटरनेट वापरलोकसभा मतदारसंघातील विधानसभानिहाय स्वतंत्र व्हॉट्सॲप्स ग्रुप आणि ब्रॉडकास्टिंग तयार आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि एक्सवर फोटो, भाषणाचे व्हिडीओ, रील्स अपलोड केले जातात. २०१९ मध्ये घरातील एक सदस्य मोबाइल वापरत होता. मात्र, आता जवळपास लहानथोर मंडळी इंटरनेट वापरतात. त्यामुळे थेट कनेक्टव्हिटी वाढली. इन्फ्लुएन्सर, मोटिव्हेशनल वक्ते आदींची मदत घेऊन त्या त्या प्रवर्गातील लोकांपर्यंत पोहोचलो आहोत. व्होटर ॲप्स, वाॅररूम, मीडिया को-ऑर्डिनेटरच्या माध्यमातून प्रभावी प्रचार सुरू आहे.- गणेश वाघ, राज्य समन्वयक,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) डिजिटल शाखा

इन्फ्लुएन्सर्सचा प्रभावसोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा प्रभाव समाजात परावर्तित होताना दिसतो. निवडणुकीत या इन्फ्लुएन्सर्सची भूमिका नक्कीच निर्णायक ठरणार आहे. इन्फोग्राफिक्स, व्हिडीओ, रील्स याचा वापर काँग्रेस करणार आहे.- प्रतीक पाटील, भारत जोडो वॉरिअर्स, महाराष्ट्र समन्वयक

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Social Mediaसोशल मीडिया