शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाचा हा शेवटचा लढा, कोणी विरोध केला तर गप्प बसणार नाही: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 18:25 IST

मराठा आरक्षणाला विरोध करु नका, तुम्ही विरोध करताल तर आम्ही देखील गप्प बसणार नाही

पैठण: जातीवंत मराठ्याची औलाद आहे. मराठा समाजासोबत कधीच गद्दारी करु शकत नाही. सरसकट मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आता गप्प बसणार नाही, अशी ग्वाही मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जंरागे पाटील यांनी पैठण येथे जाहीर सभेत बोलताना व्यक्त केला. बुधवारी रात्री साडेनऊ ते अकरा दरम्यान पैठण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मनोज जरांगे यांची सभा पार पडली. रात्री उशीर झालेला असतानाही सभेला मोठी गर्दी होती. 

मनोज जरांगे यांचे पैठण शहरात आगमन होताच २४ जेसीबीच्या सहाय्याने मनोज जरांगे पाटलावर पुष्पवृष्टी करण्यात आली. आखतवाडा ता पैठण येथील ग्रामस्थ ५० ट्रक्टरच्या रॅलीसह पैठण येथे सभेला आले होते. छत्रपती शिवाजी चौकात गर्दीच्या दृष्टीने आजवरची सर्वात मोठी सभा ठरली. यावेळी पुढे बोलताना जंरागे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षण व छत्रपतींना कोणी विरोध केला तर आम्ही गप्प बसणार नाही. आमच्या बापदाद्यांनी तुम्हाला मदत केली म्हणून तुम्ही मोठे नेते झालात. याची जाणीव ठेवा, मराठा आरक्षणाला विरोध करु नका, तुम्ही विरोध करताल तर आम्ही देखील गप्प बसणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या ओबीसी नेत्याचे नाव न घेता दिला.

ओबीसी आरक्षण ३० टक्क्यांवर कसे गेले मराठा समाज आता जागा झाला असून शासनाने ४० दिवसाच्या मुदतीत मराठाआरक्षणाचा निर्णय घ्यावा. समाज आर्थिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास असून गायकवाड आयोगाने शिफारस करुनही आरक्षण दिले नसल्याने आंदोलन सुरु केले. १९९० साली १४ टक्के असलेले ओबीसी आरक्षण १९९४ साली ३० टक्के कसे झाले? असा सवाल जरांगे यांनी यावेळी केला. शासनाला पाच हजार कुणबींचे पुरावे मिळाले असल्याने शासनाने लवकरात लवकर आरक्षणाचा निर्णय घेतला पाहीजे.

मराठा आरक्षणाचा हा शेवटचा लढा आहेमराठ्यानो संघटीत व्हा, सरकारला धडकी भरेल असा मराठा आरक्षण मेळावा १४ ऑक्टोंबर रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पार पडेल. हा मराठा आरक्षणाचा हा शेवटचा लढा आहे. या मेळाव्यात मोठ्या संख्येने मराठा समाजातील नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन शेवटी जरांगे यांनी केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaratha Reservationमराठा आरक्षण