शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘आपले हे शेवटचे बोलणे’; दुपारपर्यंत निवांत, अचानक मित्रांना फोन करत तरुणाचे टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 16:57 IST

फोननंतर ४० ते ५० कामगार मित्र त्याचा शोध घेण्यासाठी कनकोरी येथे तातडीने आले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता

गंगापूर : ‘आपले हे शेवटचे बोलणे आहे. यानंतर बोलणे होणार नाही’, असे आपल्या मित्रांना व मोठ्या भावाला फोनवर कळवून तरुणाने स्वत:च्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील कनकोरी येथे शनिवारी (दि.२७) सायंकाळी ५:३० वाजता उघडकीस आली. नारायण अशोक पवार(वय २६) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

नारायण हा लिंबेजळगाव येथील एका खाजगी कंपनीत काम करीत होता. रोजच्या प्रमाणे शनिवारी दुपारी आपले काम संपवून तो स्वत:च्या दुचाकीवर कनकोरी गावाकडे निघाला होता. यादरम्यान त्याने आपला मोठा भाऊ योगेश व कंपनीतील सहकारी मित्रांना कॉल करून सांगितले की ‘आपले यानंतर कधीच बोलणे होणार नाही, हे शेवटचे संभाषण आहे’ असे म्हणून तो दुचाकीवर कनकोरी येथील स्वत:च्या शेतात आला व त्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या मोठ्या भावाने वडिलांना त्याचा शोध घ्यायला सांगितले होते, म्हणून नारायणचे वडील अशोकराव हे सायंकाळी ५:३० वाजता शेतात गेले असता, त्यांना नारायण झाडाला फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्यांनी आक्रोश करताच आजूबाजूचे लोक जमा झाले, सर्वांनी मिळून नारायणचा मृतदेह खाली घेतला. येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून शनिवारी रात्री उशिरा नारायणाच्या पार्थिवावर कनकोरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत नारायणाच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. घटनेची सिल्लेगाव पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

दुपारपर्यंत हसत-खेळत होतानारायण ज्या कंपनीत कामाला होता तेथील काही मित्रांना त्यांनी आपले शेवटचे बोलणे आहे, असे सांगितल्याने त्याचे कंपनीतील ४० ते ५० कामगार मित्र त्याचा शोध घेण्यासाठी कनकोरी येथे तातडीने आले होते; मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. ते म्हणाले की, दिवसभर नारायण अगदी हसत खेळत होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही ताणतणाव नव्हता. पोलिसांनादेखील त्याच्याजवळ कोणतीही चिठ्ठी सापडली नाही, त्यामुळे नारायणने आत्महत्या का केली हे समजू शकले नाही.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी