शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

ही व्होट बँकेसाठी ‘नौटंकी’; केंद्रीय मंत्री भागवत कराडांची खासदार जलील यांच्यावर टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 13:01 IST

उपोषणाआडून सुरू आहे राजकारण : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री कराड यांचा आरोप

छत्रपती संभाजीनगर : मुस्लीम समाजाच्या मतांसाठी खा. इम्तियाज जलील यांनी जिल्ह्याच्या नामांतरावरून राजकीय नौटंकी सुरू केल्याची जाेरदार टीका केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केली. त्यांना औरंगजेबाचा पुळका कशासाठी येत आहे, हे त्यांनी स्पष्ट करावे, असे आव्हानही त्यांनी दिले. तसेच आ. संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थनदेखील त्यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दहा दिवसांपासून खा. जलील यांनी जिल्ह्याच्या नामांतरविरोधात साखळी उपोषण सुरू केले आहे. त्या उपोषणाला पोलिस प्रशासनाने परवानगी कशी दिली? इतर आंदोलनांना पोलिस यंत्रणा परवानगी देत नाहीत. केंद्र व राज्यातील सत्ताधारी म्हणून आपले काय मत आहे, यावर डॉ. कराड म्हणाले, पोलिस आयुक्तांना भेटून या प्रकरणी निवेदन दिले आहे.

खा. जलील यांनी नामांतरावरून मतदानाची मागणी केली आहे. यावर डॉ. कराड म्हणाले, मतदान घेऊन सरकारचा निर्णय कसा काय बदलणार? कारण जनतेने निवडून दिलेल्या केंद्र व राज्य सरकारने जिल्ह्याचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर हेच नाव कायम राहील. त्यामुळे खा. जलील यांना संसदीय राजकारणातील सहकारी म्हणून माझे आवाहन आहे की, त्यांनी हे राजकारण बंद करावे. उपोषणाच्या आडून शहराची कायदा व सुव्यवस्था खराब करू नये. केंद्र व राज्य शासनाचा निर्णय स्वीकारून विकासाच्या राजकारणावर भर द्यावा.त्यांनी आजवरच्या खासदारकीच्या कारकिर्दीत शहर व जिल्ह्याच्या विकासात काय योगदान दिले आहे, हे देखील जाहीर करावे, असे आव्हान डॉ. कराड यांनी दिले. यावेळी प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, एजाज देशमुख यांची उपस्थिती होती.

औरंगजेबाचा पुळका कशासाठी?सहकारमंत्री अतुल सावे म्हणाले, मुस्लिमांमध्ये तरी औरंगजेब असे नाव मुलांचे ठेवले जाते काय? यावरून औरंगजेब किती क्रूर होता, याचा अंदाज येताे. खा. जलील यांना औरंगजेबाचा पुळका कशासाठी आहे, हे त्यांनी सांगावे. 

टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवतImtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबाद