शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

"हे सरकार थाटामाटात मरणार; जवान शहिद होत असतांना हे स्वत:वर फुलं उधळून घेतात"

By विकास राऊत | Updated: September 15, 2023 12:49 IST

चाकूरकरांनी कोट बदलला तर राजीनामा दिला; आता यांनी काय केले पाहिजे ?

छत्रपती संभाजीनगर : विद्यमान केंद्र व राज्यातील सरकार थाटामाटातच मरणार आहे. आणि ती वेळ आम्ही आणणार आहोत. जवान शहिद होत असतांना पंतप्रधान, गृहमंत्री स्वत:वर फुलं उधळून घेतात. यांची माणसुकी कुठे गेली आहे, असा सवाल ठाकरे गटाचे नेते खा.संजय राऊत यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलतांना केला.

बेकायदेशीर राज्य सरकार मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसणार असून ते करीत असलेल्या उधळपट्टीचा त्यांना हिशेब द्यावा लागेल. असेही ते म्हणाले. विभागात दुष्काळ परिस्थिती आहे, अनेक प्रश्न आहेत. शनिवारच्या बैठकीतील पोपटपंचीकडे आमचे लक्ष राहणार आहे.

अमित शहा दिल्ली भेटत नाहीत गृहमंत्री अमीत शहा यांचा दौरा रद्द झाल्यामुळे भ्रमनिरास झाला आहे. ते दिल्लीत भेटत नाहीत, म्हणून इकडे भेटायला आलो होतो. मराठवाड्याचा अमृतकाळ कागदावर असल्याची टीकाही त्यांनी केली. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खा.चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, राजू राठोड आदींची उपस्थिती होती.

चाकूरकरांनी कोट बदलला तर राजीनामा दिला.....लष्कराचे अधिकारी दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले असताना पंतप्रधान स्वतः च्या कार्यालयात स्वतः वर फुलं उधळत होते. माजी गृहमंत्री चाकूरकर यांनी कोट बदलला तर त्यांना राजीनामा द्यावा लागला, आणि इकडे पंतप्रधान आणि भाजप उत्साहात जल्लोष साजरा करतात. यांनी काय केले पाहिजे, असा सवाल खा.राऊत यांनी केला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSanjay Rautसंजय राऊत