शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

जेलमधून सुटताच पुन्हा चोरली दुचाकी; पोलिसांनी साथीदारासह ठोकल्या बेड्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 17:20 IST

जेलमधून सुटल्यानंतर दुचाकी चोऱ्या करणाऱ्या चोरट्याला त्याच्या साथीदारासह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देया चोरट्यांनी शहरात तीन ठिकाणांहून आणि अंबड येथून एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

औरंगाबाद : जेलमधून सुटल्यानंतर दुचाकी चोऱ्या करणाऱ्या चोरट्याला त्याच्या साथीदारासह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. या चोरट्यांनी शहरात तीन ठिकाणांहून आणि अंबड येथून एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली. ही कारवाई शिवाजीनगर ते नेहरू कॉलेज रस्त्यावर करण्यात आली. सोनाजी क्षीरसागर (२७, रा. अंबड) आणि अजय नारायण व्यवहारे (२७, रा. सिडको एन-३) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले की, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विजय पवार आणि कर्मचारी बुधवारी गस्तीवर असताना गारखेडा परिसरातील भारतनगर येथे दोन जण स्वस्तात दुचाकी विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती खबऱ्याने त्यांना दिली. त्यानंतर पवार यांनी लगेच नेहरू कॉलेज रस्त्यावर सापळा रचला. त्यावेळी दोन वेगवेगळ्या दुचाकीवरुन संशयित चोरटे आले. चोहोबाजूने घेरून पोलिसांनी त्यांना पकडले. त्यानंतर त्याच्याकडील वाहनांच्या कागदपत्रांची चौकशी केली असता, त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र आढळले नाही.

त्यानंतर त्यांना गुन्हे शाखेत नेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत त्यांच्याकडील मोटारसायकली चोरीच्या असल्याचे सांगितले. त्यांनी जवाहरनगर, सिडको आणि एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन आणि अंबड येथून एक दुचाकी चोरली.  या दुचाकी पोलिसांना काढून दिल्या. यातील एका दुचाकीचे पेट्रोल संपल्यामुळे त्यांनी ती शहरातील एका ठिकाणी लपवून ठेवली होती. ही कारवाई पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पवार, पोहेकॉ मच्छिंद्र ससाणे, किरण गावंडे, गोविंद पचरंडे, विजय पिंपळे, रमेश सातपुते, चंद्रकांत सानप, दत्ता ढंगारे आणि चालक पवार यांनी केली.

आरोपी सोनाजी क्षीरसागर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल चोरटा आहे. तो वाहनचोरीच्या गुन्ह्यात जालना येथील कारागृहात कैद होता. तो नुकताच कारागृहातून बाहेर आला आणि त्याने औरंगाबादेत येऊन वाहनचोऱ्या करण्यास सुरुवात केली. अटकेनंतर त्याने चार दुचाकी चोरी केल्याचे सांगितले असले तरी, त्याच्याकडून वाहनचोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येईल,अशी शक्यता पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी व्यक्त केली.

टॅग्स :theftचोरीAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसtwo wheelerटू व्हीलर