चोरट्याने दुचाकी लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:05 AM2021-05-11T04:05:57+5:302021-05-11T04:05:57+5:30

------------------------- मृत दुचाकीस्वाराची ओळख पटेना वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत तीन दिवसांपूर्वी गंभीर जखमी अवस्थेत मिळून आलेल्या अनोळखी दुचाकीस्वाराचा ...

The thief lengthened the bike | चोरट्याने दुचाकी लांबविली

चोरट्याने दुचाकी लांबविली

googlenewsNext

-------------------------

मृत दुचाकीस्वाराची ओळख पटेना

वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत तीन दिवसांपूर्वी गंभीर जखमी अवस्थेत मिळून आलेल्या अनोळखी दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, अद्यापपर्यंत त्याची ओळख पटलेली नाही. कामगार चौकात शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास अनोळखी दुचाकीस्वार गंभीर जखमी अवस्थेत पोलिसांना मिळून आला होता. त्या अनोळखी दुचाकीस्वारास पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले आहे. या मृत दुचाकीस्वाराच्या नातेवाइकाचा शोध पो.ना. जाधव हे घेत आहेत.

-----------------------------------------

दुभाजकावर कचऱ्याची विल्हेवाट

वाळूज महानगर : पंढरपुरात रस्त्याच्या दुभाजकावर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. औरंगाबाद-नगर महामार्गावरील या दुभाजकावर नागरिक केर-कचरा आणून टाकत असतात. अनेक नागरिक सकाळीच पॉलिथीनच्या पिशव्या, केर-कचरा आणून टाकत असल्याने दुभाजकावर अस्वच्छता पसरली असून रस्त्यावरही कचरा पडत आहे. या कचऱ्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिक व वाहनधारकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.

------------------------

साऊथ सिटीत पक्के रस्ते करा

वाळूज महानगर : साऊथ सिटीत अंतर्गत रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण करून पक्के रस्ते तयार करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. या परिसरातील अंर्तगत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या रस्त्यावर पाणी साचत असल्याने नागरिकांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागते. या कामगार वसाहतीमधील रस्त्याचे पक्के डांबरीकरण करण्याची मागणी नारायण हातोळे व नागरिकांनी केली आहे.

-------------------------

आठवडी बाजारात विक्रेत्यांना पिटाळले

वाळूज महानगर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सोमवारी वाळूजच्या आठवडी बाजारातून विक्रेत्यांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी पिटाळून लावले. सध्या कोरोनामुळे संचारबंदी लागू करण्यात आली असून, ग्रामपंचायतीने आठवडी बाजार न भरविण्याचा निर्णय घेतला आहे. आठवडाभरापूर्वी बाजारात भाजीपाला विक्रीसाठी आलेल्या शेतकरी व व्यापाऱ्यावर कारवाई करण्यात आली होती. सोमवारीही ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी भाजीपाला विक्रेत्यांना पिटाळून लावल्याने बाजार भरलाच नाही.

---------------------

Web Title: The thief lengthened the bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.