शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

हे आहेत प्राण्यांसाठी आरोग्य शिबिरे घेणारे अवलिया; खेड्यापाड्यांत देतात मोफत सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2022 15:58 IST

सौर ऊर्जेवर चालणारी रुग्णवाहिका, चालते-फिरते शस्त्रक्रियागृहदेखील

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : माणसांच्या विविध आजारांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन हे नेहमीच ऐकण्यात येते; परंतु औरंगाबादेत असे काही अवलिया आहेत, जे प्राण्यांच्या आरोग्यासाठी (health camps for animals) खेड्यापाड्यात जाऊन मोफत शिबिर घेत आहेत. शिबिरात जर एखाद्या प्राण्यावर शस्त्रक्रियेची गरज पडली तर तीदेखील तत्काळ केली जाते. त्यासाठी चालते-फिरते शस्त्रक्रियागृह असलेली रुग्णवाहिकाही त्यांच्या ताफ्यात आहे.

औरंगाबादेतील हे अवलिया आहेत होप ॲण्ड ॲनिमल ट्रस्टचे सचिव प्रवीण ओहळ, पशुचिकित्सक डाॅ. गणेश चेडे, औरंगाबाद फाॅर ॲनिमल्सच्या व्यवस्थापिका शक्ती वाखले, सहायक पशुचिकित्सक सुनील आणि प्रशिक. होप ॲण्ड ॲनिमल ट्रस्ट, औरंगाबाद फाॅर ॲनिमल या माध्यमातून गेल्या अनेक महिन्यांपासून प्राण्यांसाठी हे सर्व जण अहाेरात्र झटत आहेत. या संस्थेचे जांभाळा येथे प्राण्यांसाठी निवारागृह आहे. शहरातील मोकाट कुत्रे आणि इतर प्राण्यांची प्रशासनातर्फे व्यवस्था होते; परंतु ग्रामीण भागातील प्राण्यांकडे काहीसे दुर्लक्ष होते. ही बाब ओळखून संस्थेने सौर ऊर्जेवर चालणारी आगळीवेगळी रुग्णवाहिका तयार केली आहे. या रुग्णवाहिकेत भटक्या कुत्र्यांना ठेवण्यासाठी जागा आहे. त्याबरोबर याच रुग्णवाहिकेत ओटी टेबलही आहे.

नागरिकांना वाटते कुतूहलग्रामीण भागात गेल्यानंतर प्राण्यांसाठी आरोग्य शिबिर आहे, सांगितल्यानंतर अनेकांना कुतूहल वाटते. मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीची शस्त्रक्रिया आणि इतर काही शस्त्रक्रिया करण्याची गरज पडली तर तीही या रुग्णवाहिकेत करता येते. औरंगाबाद जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमध्ये प्राण्यांसाठी मोफत आरोग्य शिबिरे घेण्यात आली आहेत. शिबिरांमुळे अनेक प्राण्यांना जीवदानदेखील मिळाले आहे.

पक्ष्यालाही जीवदानशक्ती वाखले म्हणाल्या, शिबिरात एकदा एक व्यक्ती मोठा पक्षी घेऊन आला होता. या पक्ष्यावर उपचार करून वन विभागाच्या ताब्यात दिले. मोकाट कुत्र्यांना कसे हाताळले पाहिजे, याचे प्रशिक्षणही आम्ही नागरिकांना देताे. गावात गेल्यानंतर विविध प्राणी घेऊन नागरिक येतात. त्यांच्यावर मोफत उपचार करतो.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्यsocial workerसमाजसेवक