शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पार्सल बॉयच्या वेशात आलेल्या चोरट्यांनी १५ मिनिटांत पळवले १८ लाखांचे सुवर्णलंकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 17:04 IST

'पार्सल बॉय' म्हणून आले अन मुलीच्या लग्नासाठी जमविलेले १८ लाखांचे दागिने पळविले

ठळक मुद्देमाजी सैनिकाचे घर फोडलेपडेगावात भरदिवसा घरफोडी

औरंगाबाद : पडेगाव, गुलमोहर कॉलनीतील माजी सैनिकाचे घर गुरुवारी भरदुपारी फोडून चोरट्यांनी १७ लाख ५० हजार रुपये किमतीचे  ३५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि दोन हजारांची रोकड पळविली.  

सूर्यकांत शेकू जाधव (५७, रा. प्लॉट क्र. १११) यांनी सकाळी ११:3० वाजेच्या सुमारास पत्नी आणि मुलीला रेल्वेस्टेशन परिसरात एका विवाहस्थळी सोडले. तेथून  ते माजी सैनिक कल्याण कार्यालयात कामावर गेले. दुपारी १:3० ते १:४५  वाजता कुरिअरच्या पार्सलची बॅग आणि तोंडाला मास्क लावलेले  दुचाकीस्वार दोन संशयित तरुण गुलमोहर कॉलनीत आले. ते  जाधव यांच्या घरापासून अंदाजे २० फूट अंतरावर उभे राहिले. शेजारील सैनिकाने त्यांना पाहिले आणि कोणाकडे आलात  असे विचारले. त्यांच्यापैकी एकाने साहेबांकडे आलो आहे, त्यांना कुरिअरचे पार्सल द्यायचे असल्याचे सांगितले. जाधव कुटुंब घरी नसल्याचे त्या जवानाला माहिती नव्हते, यामुळे त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. 

यानंतर एक जण जाधव यांच्या बंगल्यात घुसला. तर दुसरा बाहेर थांबला.  काही मिनिटांत चोराने  मुख्य दाराचा  कडीकोंडा तोडून आत घुसला. तो बेडरूममध्ये गेला आणि लोखंडी कपाटातील ३५ तोळे सोन्याचे दागिने आणि दोन हजारांची रोकड घेऊन दोघांनी पोबारा केला. सायंकाळी ४:3० वाजेच्या सुमारास जाधव यांची पत्नी घरी आली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी रडतच ही माहिती जाधव यांना कळविली.  जाधव घरी येईपर्यंत शेजाऱ्यांनी छावणी पोलिसांना कळविले. गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक शेख, हवालदार प्रकाश चव्हाण, राजू सोळुंके, नितीन देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथक आणि  ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

दुसऱ्या मुलीचेही दागिने त्यातच ठेवलेलेजाधव यांची विवाहित मुलगी आणि जावई रेल्वेस्टेशन परिसरात राहतात. चोऱ्या होतात म्हणून थोरल्या मुलीने त्यांचे दागिने माहेरी आणून ठेवले होते. धाकट्या मुलीच्या लग्नासाठी खरेदी केलेले सोन्याचे दागिने, पत्नीचे दागिने एकत्र  लोखंडी कपाटात ठेवले होते.

चोरी गेलेला ऐवजबांगड्या - साडेपाच तोळे, पोत ४ तोळे, अंगठी ९ ग्रॅम, ४ अंगठ्या २ तोळे, शुद्ध सोन्याचा अंगठीचा पिळा १५ ग्रॅम, गंठण साडेतीन तोळे, मिनी गंठण साडेचार तोळे, नेकलेस ३ ग्रॅम, ४ नग वाकडी नथ साडेचार तोळे, २ नग सोनसाखळी  २० ग्रॅम, लॉकेट २५ ग्रॅम, पुतळी २ नग ६ ग्रॅम. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद