शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
5
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
6
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
7
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
8
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
9
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
10
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
11
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
12
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
13
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
14
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
15
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
16
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
17
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
18
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
19
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
20
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

खताची टंचाई भासणार

By admin | Updated: April 27, 2016 00:38 IST

सुनील कच्छवे, औरंगाबाद मागणीपेक्षा कमी साठा मंजूर झाल्यामुळे जिल्ह्यात खरीप हंगामात खताची टंचाई भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सुनील कच्छवे, औरंगाबादमागणीपेक्षा कमी साठा मंजूर झाल्यामुळे जिल्ह्यात खरीप हंगामात खताची टंचाई भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कृषी विभागाने जिल्ह्यासाठी २ लाख ९३ हजार मेट्रिक टन खताची मागणी नोंदविली होती. परंतु शासनाकडून २ लाख २० हजार मेट्रिक टन इतक्याच खताचा साठा मंजूर झाला आहे.हवामान खात्याने यंदा मान्सूनचे लवकर आगमन होण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीसे आनंदाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खरिपाची पूर्व तयारीही सुरू झाली आहे. परंतु यंदा जिल्ह्यासाठी तुलनेने खताचा साठा कमी मंजूर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खताच्या तुटवड्याला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात यंदा मागील वर्षीपेक्षा कापसाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे खताची मागणीही अधिक असणार आहे. गतवर्षी जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र २ लाख ९५ हेक्टर होते. यावर्षी ते ४ लाख २५ हेक्टरपर्यंत जाण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे खताची वाढीव मागणी नोंदविण्यात आली होती; परंतु प्रत्यक्षात आधीच्या वर्षापेक्षाही कमी खताचा साठा मंजूर झाला आहे. कृषी विभागाने या खरीप हंगामासाठी एकूण २ लाख ९३ हजार मेट्रिक टन खताची मागणी नोंदविली होती. त्या तुलनेत केवळ २ लाख २० हजार मेट्रिक टन खतच मंजूर झाला आहे. विशेष म्हणजे २०१३-१४ आणि २०१४-१५ या दोन्ही वर्षांमध्ये जिल्ह्यात २ लाख ३५ हजार मेट्रिक टन इतका खताचा साठा मंजूर झाला होता. शासनाने तुलनेने सर्वात कमी संयुक्त खतांचा साठा मंजूर केला आहे. कृषी विभागाने संयुक्त खताच्या १ लाख १८ हजार मेट्रिक टन साठ्याची मागणी नोंदविली होती, पण त्या तुलनेत केवळ ६७ हजार मेट्रिक टन इतकाच खत मंजूर केला आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून युरिया खताचा वापर सर्वाधिक होतो. त्यामुळे कृषी विभागाने चालू वर्षासाठी युरिया खताची १ लाख १० हजार मेट्रिक टन खताची मागणी नोंदविली होती. प्रत्यक्षात १ लाख मेट्रिक टन युरिया मंजूर झाला आहे. इतर खतांचा साठाही मागणीपेक्षा कमी झाला आहे.तालुकानिहाय मागणी व मंजूर साठा (मे. टन)तालुकामागणीमंजूर साठाऔरंगाबाद ३२,२३०२४,२८८पैठण२९,३००२२,०८०गंगापूर४१,०२०३०,९१२वैजापूर४६,८८०३५,३२८कन्नड४१,०२०३०,९१२खुलताबाद१४,६५०११,०४०सिल्लोड४३,९५०३३,१२०सोयगाव२०,५१०१५,४५६फुलंब्री२३,४४०१७,४५६एकूण२,९३,०००२,२०,८००खताचा साठा पुरेलमागच्या वर्षी कमी पावसामुळे जिल्ह्यात खताला कमी उठाव होता. त्यामुळे काही खत शिल्लक आहे. त्यामुळे खरिपात खताचा साठा पुरेल असे वाटते, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. जी. पडवळ म्हणाले.