शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आता महाविद्यालयांमध्ये होणार दीक्षांत सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 01:02 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्येही यावर्षीपासून दीक्षांत सोहळा होणार असल्याची माहिती परीक्षा संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी दिली. विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा झाल्यानंतर पुढील १५ दिवसांत महाविद्यालयांमध्ये दीक्षांत सोहळे होतील.

ठळक मुद्देविद्यापीठ : पदवी अभ्यासक्रमाची महाविद्यालयात, तर पदव्युत्तरची पदवी विद्यापीठात मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्येही यावर्षीपासून दीक्षांत सोहळा होणार असल्याची माहिती परीक्षा संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी दिली. विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा झाल्यानंतर पुढील १५ दिवसांत महाविद्यालयांमध्ये दीक्षांत सोहळे होतील. यात केवळ पदवी अभ्यासक्रमांच्या पदव्या दिल्या जातील. पदव्युत्तर, एम.फिल. आणि पीएच.डी.ची पदवी ही विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा १५ मे रोजी आयोजित केला आहे. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. मात्र, या दिवशी पदवी अभ्यासक्रमांच्या पदव्यांचे वाटप होणार नसल्याची माहिती परीक्षा संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी दिली. पदवी अभ्यासक्रमांच्या पदव्यांचे वाटप १६ ते ३० मेदरम्यान महाविद्यालयांमध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये होणार आहे.यावर्षीपासून हा नवीन बदल करण्यात येत आहे. मुंबई, पुणे विद्यापीठांमध्ये अशा पद्धतीचे महाविद्यालयात दीक्षांत सोहळे घेण्यात येतात. त्याचीच पुनरावृत्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ करणार आहे. विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात पदव्युत्तर, एम.फिल. आणि पीएच.डी. अभ्यासक्रमांचीच पदवी प्रदान केली जाणार आहे. यामुळे महाविद्यालयांमध्येही दीक्षांत सोहळ्याची रेलचेल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.नियम कडक करणारविद्यापीठाचा दीक्षांत सोहळा झाल्यानंतर पुढील १५ दिवसांमध्ये महाविद्यालयांना दीक्षांत समारंभ किंवा विद्यार्थ्यांमध्ये पदव्यांचे वाटप करावे लागणार आहे. यासाठी विद्यापीठात पाळण्यात येणारे सर्व नियम महाविद्यालयांनाही पाळावे लागतील. कोणत्याही विद्यार्थ्याची पदवी गहाळ होणे, न देणे याला महाविद्यालयेच पूर्णपणे जबाबदारी राहतील, असेही डॉ. नेटके म्हणाले.विद्यार्थ्यांचे पदवी अर्ज भरून घेतले४विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमांच्या शेवटच्या सत्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेचा अर्ज दाखल करतानाच पदवीचेही अर्ज भरून घेतले असल्याची माहिती डॉ. नेटके यांनी दिली. यापूर्वी दीक्षांत सोहळ्यात १० टक्के विद्यार्थीही पदवी घेत नव्हते. यामुळे विद्यापीठाकडे लाखो पदव्या अनेक वर्षांपासून जमा आहेत. यातून विद्यापीठाचा कोट्यवधी रुपयांचा महसूलही बुडालेला आहे. यावर उपाय म्हणून अंतिम सत्राची परीक्षा देण्यापूर्वीच विद्यार्थ्यांकडून पदवी अर्ज भरून घ्यायचा आणि दीक्षांत सोहळा होताच पदवी संबंधित महाविद्यालयाकडे पाठवून देण्यात येणार आहे. याविषयीचा निर्णय काही महिन्यांपूर्वी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत झाल्याचेही डॉ. नेटके यांनी सांगितले. याची अंमलबजावणी १५ मेनंतर होणार आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थी