शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज महानगरात जैवयांत्रिकी खत प्रकल्प येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 12:49 IST

सिडको वाळूज महानगरातील कचरा व्यवस्थापनासंदर्भात प्रशासनाने पावले उचलली असून, नवी मुंबईच्या धर्तीवर वाळूजला स्वतंत्र जैव यांत्रिकी खत प्रकल्प (बायो मेकॅनिकल कंपोस्टिंग प्रोजेक्ट) उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देया प्रकल्पात दररोज ५ मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. 

वाळूज महानगर ( औरंगाबाद ): सिडको वाळूज महानगरातील कचरा व्यवस्थापनासंदर्भात प्रशासनाने पावले उचलली असून, नवी मुंबईच्या धर्तीवर वाळूजला स्वतंत्र जैव यांत्रिकी खत प्रकल्प (बायो मेकॅनिकल कंपोस्टिंग प्रोजेक्ट) उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून, लवकरच प्रकल्प उभारणीला सुरुवात होणार आहे. या प्रकल्पात दररोज ५ मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. 

औरंगाबाद महापालिकेचा कचऱ्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून धुमसत आहे. महापालिकेला भेडसावणाऱ्या कचरा प्रश्नावर अद्याप तोडगा निघत नसताना सिडको प्रशासनाने वाळूज महानगरात घनकचरा व्यवस्थापनांतर्गत खतनिर्मिती प्रकल्प उभारण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. ओला, सुका व टाकाऊ कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे.३ वर्षांपासून सिडको हा प्रकल्प यशस्वीरीत्या राबवीत आहे. सिडकोने नवी मुंबई येथे जैव यांत्रिक खत प्रकल्प उभारून येथील कचऱ्याचा प्रश्न निकाली काढला आहे. 

सिडको वाळूज महानगरातून आजघडीला दररोज जवळपास तीन ते साडेतीन मेट्रिक टन कचरा संकलित केला जात आहे. दिवसेंदिवस सिडको परिसराचा झपाट्याने विकास होत असून, नागरी वसाहती वाढत आहेत. त्यामुळे भविष्यात महापालिकेसारखा कचरा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सिडको प्रशासन आतापासूनच घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात काळजी घेत आहे.नवी मुंबईच्या धरतीवर येथे स्वतंत्र जैव यांत्रिक प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेऊन तसा प्रस्ताव मुंबई कार्यालयास पाठविला आहे. या प्रस्तावला मुंबई येथील कार्यालयातून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे हा प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

महानगर १ मध्ये होणार प्रकल्पया प्रकल्पासाठी सिडको वाळूज महानगर १ येथे जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. साधारणत: सुमारे सव्वाकोटी रुपये खर्च करून ४५० चौरस मीटर जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. दररोज ५ मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. 

प्रकल्प फायदेशीरचया प्रकल्पापासून दुर्गंधी पसरत नसल्याने निवासी क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याला धोका नाही. कचरा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. शिवाय प्रकल्पात तयार होणारे खत शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असल्याने लगतच्या शेतकऱ्यांना खत उपलब्ध होणार आहे. यातून सिडकोला उत्पन्न होणार आहे. 

टॅग्स :cidco aurangabadसिडको औरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्नAgriculture Sectorशेती क्षेत्र