शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

‘वंचित बहुजन आघाडी’ची माफी मागण्याचा प्रश्नच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 13:08 IST

राज ठाकरे यांच्याजवळ जाण्या-येण्याचाही प्रश्न नाही

ठळक मुद्देथोरात, चव्हाण यांची स्पष्टोक्ती  ईव्हीएम नको  या मताचे पक्ष येत्या २१ आॅगस्ट रोजी मुंबईत मोर्चा काढणार

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीशी आम्ही संपर्कात आहेत. आता निर्णय वंचित बहुजन आघाडीने घ्यायचा आहे. वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हटले म्हणून काँग्रेसने माफी मागण्याचा प्रश्नच नाही.  लोकसभा निवडणुकीत ते प्रतिस्पर्धी म्हणून आमच्यासमोर उभे ठाकल्यानंतर आरोप-प्रत्यारोप तर होणारच आणि त्यांच्यामुळे काँग्रेसचे  नुकसान झाले, हे वेगळे सांगण्याची गरज नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि माजी प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी केले.

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार बाबूराव कुलकर्णी यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यास मार्गदर्शन केल्यानंतर नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व अशोकराव चव्हाण यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. ईव्हीएम नको  या मताचे पक्ष येत्या २१ आॅगस्ट रोजी मुंबईत मोर्चा काढणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे काँग्रेसच्या जवळ येत आहेत, असे वगैरे काही नाही. त्यांच्याशी यासंदर्भात कसली बोलणीही झालेली नाही, असे यावेळी बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. 

...तर अनेक राज्ये बरखास्त होतील! ३७० कलम हटविण्यासंदर्भात बाळासाहेब व अशोकरावांचे म्हणणे पडले की, हे लोकशाहीला घातक असून अशाने अनेक राज्ये उद्या बरखास्त होतील. महाराष्ट्राचेही तुकडे पडतील. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, असे म्हणणारे मुख्यमंत्री खोटे बोलत आहेत. ओबीसींच्या राजकीय आरक्षणात कपात करण्याचा अध्यादेश काढीत आहेत, असे चव्हाण म्हणाले. प्रांताध्यक्षांनी आदेश दिल्यास मी विधानसभा निवडणूकही लढायला तयार असल्याचे हसत हसत चव्हाण यांनी नमूद केले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा वाटपात काही अडचणी नाहीत; पण इंदापूरची जागा काँग्रेसला हवीय, असे एका प्रश्नाच्या उत्तरात थोरात यांनी सांगितले. 

मागच्या वेळी पंचांगात योग नव्हता...बाबूराव कुलकर्णी यांच्या प्रचारार्थ झालेल्या बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे जि.प. सदस्य, मनपा नगरसेवक, नगरपालिकेचे नगरसेवक आदी उपस्थित होते. यावेळी स्वत: बाबूराव कुलकर्णी यांनी, सध्या श्रावण महिना सुरू असल्यामुळे ब्राह्मणाला दान द्या आणि निवडून आणा, असे आवाहन केले. त्यानंतर राष्ट्रवादीचे कदीर मौलाना यांचे भाषण झाले. ‘बाबूराव उधर के ब्राह्मण है, तो मैं भी मौलाना इधर का ब्राह्मण हू’ असे उद्गार काढून हास्याचे कारंजे उडवले.बाळासाहेब थोरात व अशोकराव चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले व कुलकर्णी यांना निवडून आणणे हे  कसे आवश्यक झाले आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. मागच्या वेळेच बाबूराव कुलकर्णी यांना तिकीट द्यायचे होते; पण त्यावेळी त्यांच्या पंचांगात योग नव्हता. आता योग आहे, असे बाळासाहेब उद्गारले.

‘...तर एक लाख तरुण बेरोजगार होतील’राज्य शासनाच्या धोरणामुळे सध्या औरंगाबादेतील आॅटोमोबाईल इंडस्ट्री बंद पडत आहे. त्यामुळे आगामी काळात मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण होईल. किमान ५० हजार ते एक लाख तरुण बेरोजगार होतील, असा धोका माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, औरंगाबादची किंबहुना मराठवाड्याची इकॉनॉमी या आॅटोमोबाईल इंडस्ट्रीवर अवलंबून आहे; पण तीच आता बंद पडत आहे. टाटा मोटार्स कंपनीने ले आॅफ द्यायला सुरुवात केलेली आहे. राज्य सरकारचे मराठवाड्याकडे मुळीच लक्ष नाही. यांना फक्त प्रचारयात्रा दिसताहेत. मराठवाड्याचा विकास दिसत नाही. मराठवाड्यात अद्यापही पाऊस समाधानकारक नाही. कुठे कुठे तरी पाऊस नाही म्हणून दुबार पेरण्या कराव्या लागत आहेत. सरकारच्या कर्जमुक्तीची घोषणा नुसती घोषणाच राहिलेली आहे. शेतकºयांच्या आत्महत्या थांबत नाहीत. हे सरकारला दिसत नाही, अशी टीकाही चव्हाण यांनी केली. 

उत्तमसिंग पवार काँग्रेसमध्येमागील काही वर्षांपासून उत्तमसिंग पवार हे राजकीय अज्ञातवासात होते. आज त्यांनी हा अज्ञातवास संपवत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ‘मी काँग्रेसमध्येच होतो; पण आता  अधिक सक्रिय होईल,’ असे प्रवेशानंतर सांगितले. थोरात व चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी सूत्रसंचालन केले. मंचावर आमदार सुभाष झांबड, जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष अनिल पटेल, राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, शहराध्यक्ष विजय साळवे, माजी आमदार एम.एम. शेख, रंगनाथनाना काळे, कल्याण काळे, अशोक सायन्ना, अभिषेक देशमुख, राजेश पवार, सूरजितसिंग खुंगर, नगरसेवक अफसर खान आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :congressकाँग्रेसVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीNCPराष्ट्रवादी काँग्रेस