शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणुकीसाठी सर्व पक्षांच्या स्वबळाच्या ‘जोर’बैठका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 19:10 IST

निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.

ठळक मुद्देयुतीसंदर्भात कोणत्याच राजकीय पक्षाचा निर्णय नाहीसहा निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप निर्विवाद वर्चस्व

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीसंदर्भात ३ फेब्रुवारी रोजी वॉर्ड आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.

भाजप स्वबळाच्या दृष्टीने जोरदार तयारी करीत आहे. पक्षाकडून वॉर्डनिहाय बैठकींचा ‘सिलसीला’ सुरू झाला आहे. वंचित बहुजन आघाडीही स्वबळावर निवडणूक लढण्याचा विचार करीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना-काँग्रेससोबतच्या आघाडीत लढण्यास उत्सुक असल्याचे दिसून आले. मात्र, काँग्रेसच्या वरिष्ठांनी आघाडीसंदर्भात कोणतेच संकेत दिले नसल्याने स्थानिक पातळीवर स्वबळाची तयारी सुरू झाली आहे. महापालिकेच्या राजकारणात किंगमेकरची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेने स्वबळासाठी कंबर कसली आहे.

महापालिकेत १९८८ पासून २०१५ पर्यंतच्या सहा निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजपने निर्विवाद वर्चस्व निर्माण केले. स्वतंत्र निवडणुका लढवून परत सत्तेसाठी दोन्ही पक्ष एकत्र येत. आता दोन्ही पक्षांमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राज्यात युती केली आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग होणार किंवा नाही याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. ३ फेब्रुवारी रोजी वॉर्डांचे आरक्षण जाहीर झाल्यावर ११५ वॉर्डांचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतरच पुढील राजकीय रणनीती ठरविण्यावर सर्वच राजकीय पक्षांनी भर दिला आहे. समविचारी पक्षांसोबत ऐनवेळेपर्यंत युती होईल किंवा नाही, यावर कोणीच ठाम नाही. त्यामुळे बहुतांश पक्षांनी स्वबळाची तयारी ठेवली आहे.

शिवसेनेचीही स्वबळाचीच तयारीमहाविकास आघाडीसंदर्भात वरिष्ठांकडून अद्याप कोणताही निर्णय प्राप्त नाही. वरिष्ठांनी सांगितल्यानुसारच निवडणूक लढविण्यात येईल. आरक्षणानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. पक्षपातळीवर आम्ही स्वबळाच्या हिशोबाने तयारी पूर्णपणे करून ठेवली आहे.- आ. अंबादास दानवे, शिवसेना, जिल्हाप्रमुख

भाजपकडून स्वबळाची तयारीरिपाइं आठवले गट, वंचित बहुजन आघाडी यांना सोबत घेता येऊ शकते का, याची चाचपणी करीत आहोत. यासंदर्भात कोणताही निर्णय पक्षाची कोअर कमिटीच घेणार आहे. कोणासोबतही युती न झाल्यास स्वबळाच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. -संजय केणेकर, शहराध्यक्ष भाजप

राष्ट्रवादीचा फायदा आघाडीतराष्ट्रवादी काँग्रेसने मनपा निवडणूक आघाडीसोबत लढविल्यास फायदा होईल, असे वाटत आहे. वरिष्ठ यासंदर्भात जे आदेश देतील त्याचे पालन करण्यात येईल. पक्ष म्हणून स्वबळाची तयारी ठेवलेली आहे. -विजय साळवे, शहाराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

वरिष्ठांकडून कोणतेच संकेत नाहीतराज्यातील महाविकास आघाडीसंदर्भात वरिष्ठांकडून अद्याप कोणतेही संकेत देण्यात आलेले नाहीत. वरिष्ठांकडून ऐनवेळी आदेश आल्यास त्यादृष्टीने काम करण्यात येईल. स्वबळाच्या दृष्टीने आमची तयारी आहे.     -नामदेव पवार, शहाराध्यक्ष काँग्रेस

अद्याप कोणाचाही प्रस्ताव नाहीवंचित बहुजन आघाडीने स्वबळाची तयारी सुरू केली आहे. कोणत्याच राजकीय पक्षाचा प्रस्ताव आमच्याकडे आला नाही. एखाद्या पक्षासोबत युती करायची असेल तर अंतिम निर्णय पक्षप्रमुख प्रकाश आंबेडकर घेतील.    -अमित भुईगळ, ‘वंबआ’चे नेते

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूक